पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. निवडणुकांपूर्वीच काही लोकांनी ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’, अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळेच ते सध्या अस्वस्थ होत असतील, तर मी त्यांना दोष देणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चिमटा काढला. ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रपती राजवट लागू होणार ?

दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीविषयी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले की, सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. माझी सत्ता कैकदा गेली आहे. १९८० साली माझे सरकार बरखास्त झाले. रात्री साडेबारा वाजता मुख्य सचिवांनी मला ही बातमी दिली. त्यानंतर मी तीन-चार लोकांना बोलावून घरातील सामान आवरले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. सरकारची गादी सोडली. त्यादिवशी मुंबईत इंग्लंड आणि भारत यांची क्रिकेट मॅच होती. ती मॅच पाहण्यासाठी मी सकाळी १० वाजता वानखेडे स्टेडिअमवर गेलो आणि दिवसभर मॅच पाहण्याचा आनंद लुटला. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे आपण इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘सोमय्यांच्या हनुवटीतून रक्त ओघळायला हवं होतं पण…’, भुजबळांच्या गंभीर आरोपाने खळबळ
शरद पवारांच्या प्रतिक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे

– देशातील अनेक राज्यात वीजेचा मुद्दा गंभीर आहे. एकतर प्रमाणापेक्षा जास्त वापर, शेती आणि सगळ्या गोष्टींनी मागणी वाढत असल्याने वीजेचा प्रश्न

– सगळ्यांनी बसून मार्ग काढला पाहिजे, राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही हे पाहिलं पाहिजे

– एखाद्या धर्मासंबंधी विचारासंबधी प्रत्येक व्यक्तीला भावना असतात. त्या आपल्या घरात ठेवाव्यात

– महाराष्ट्रात अलीकडच्या काळात व्यक्तिगत गोष्टी होतात. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यात जाहीर मतभेद होते मी इतकी वर्षे काम केले. असे
शब्द वापरण्याची काटकसर एकमेकांविरुद्ध आम्ही कधीही केली नाही

– बैठक संपल्यानंतर ते माझ्या घरी यायचे मी त्यांच्या घरी जायचो Sharad Pawar: धार्मिक भावना आपल्या अंत:करणात आणि घरातच ठेवाव्यात: शरद पवार
– चर्चा झाल्यानंतर सगळे एकत्र बसून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय करायचे

– हल्ली काही लोक खूप अस्वस्थ होतात त्यांना मी दोष देऊ शकत नाही

– निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार मी येणारच्या घोषणा त्यांनी दिल्या

– पण अपेक्षा करू या, आमच्या स्नेह्यांना या सगळ्यातून परिस्थिती निर्माण होते हे लक्षात येईल. आणि इथे योग्य वातावरण निर्माण करायला सहकार्य मिळेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here