हिंगोली: जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ इथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आजी-आजोबा व वडील शेतीकामासाठी शेतात गेल्यानंतर सदर अल्पवयीन मुलगी घरामध्ये एकटी असल्याचा फायदा घेऊन प्रवीण उत्तमराव पाईकराव या आरोपीने तिच्या घरात अधिकृतरीत्या प्रवेश करुन दरवाजा बंद केल्यानंतर वरील मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

जीवे मारण्याची दिली धमकी…

दरम्यान, ही घटना कोणाला सांगितल्यास तुझे तुकडे तुकडे करून कॅनॉल मध्ये टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीच्या पित्याने २३ आखाडाबाळापुर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण उत्तम पाईकराव या आरोपीवर ‘प्रॉक्सो बाल लैंगिक अत्याचार’ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्य सरकारची चाणाक्ष खेळी; भोंग्यांबाबत नेमका काय निर्णय झाला?
ही घटना १७ ते २२ एप्रिल या कालावधी दरम्यान घडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. दिवसेंदिवस हिंगोली जिल्ह्यासारख्या ठिकाणी सुद्धा अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरंच महिला व लहान बालके सुरक्षित आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here