मुंबई : बॉलिवूडमध्ये स्टारकीडसच्या डेब्यूची चलती असताना अभिनेता आर. माधवन याचा जलतरणपटू असलेला मुलगा वेदांत २०२६ च्या ऑलिम्पिकची कसून तयारी करतोय. वेदांतला सराव करण्यासाठी सुविधायुक्त टँक तलाव मिळावा यासाठी माधवनने कुटुंबासमवेत देश सोडून दुबईत मुक्काम ठोकला आहे. वेदांतनेही गेले वर्षभर वडिलांच्या त्यागाचं चीज करत कोपनहेगन इथे झालेल्या डॅनिश ओपन स्पर्धेत रौप्य आणि सुवर्ण पदकावर नाव कोरलं. मुलाच्या यशाचा आनंद आर. माधवनने सोशल मीडियावर साजरा केला. आता आर . माधवनला अजून अभिमान वाटेल असं भाष्य वेदांतने केलं आहे. स्टार किडस म्हणजे फक्त रूपेरी पडदयावर झळकण्याचं सोप्पं तिकीट नाही हे वेदांतने दाखवून दिलं आहे.


डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेतील दणदणीत यशानंतर वेदांतची दूरदर्शनवर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत वेदांतने त्याच्या आईवडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव असल्याचं सांगितलं. या मुलाखतीत वेदांत म्हणाला, माझे वडील आर. माधवन आणि आई सरिता यांनी दुबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांचंही करिअर आहे, त्यांचीही कामं आहेत. पण ते सगळं सोडून माझ्या करिअरसाठी त्यांनी देश सोडला. सेलिब्रिटी अभिनेता असून माझ्या वडिलांनी त्यांच्या करिअरचा विचार केला नाही. हे मी कधीच विसरणार नाही.

‘शेर शिवराज’ चित्रपटाचा शेवट व्हायरल करू नका; असं का म्हणाला चिन्मय मांडलेकर?

वेदांत माधवन कुटुंबाबरोबर

आईवडिलांनी माझी खेळाची आवड आणि स्वीमिंगचं पॅशन याला नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. सेलिब्रिटी अभिनेता आर. माधवन यांचा मुलगा म्हणून मला लोकांनी ओळखू नये असं मला वाटतं. मला ही ओळख घेऊन जगायचे नाही. स्टार किड म्हणवून घेण्यापेक्षा मला माझं स्वतंत्र आस्तित्व निर्माण करायचं आहे. वेदांतने मिळवलेल्या पदकांनी आधीच आनंदात असलेल्या आर. माधवन याचा ऊर मुलगा वेदांतच्या बोलण्याने अभिमानाने भरून गेला आहे.

भारती सिंगनं शेअर केला लेकाचा Photo, मुलाच्या प्रेमात रमून गेली कॉमेडी क्वीन


दरम्यान, मुलाच्या स्वीमिंग सरावासाठी योग्य मार्गदर्शन आणि सुविधा मिळाव्यात यासाठी देश सोडत असल्याचं आर. माधवन याने सांगितलं होतं. तसंच देश सोडताना तो असं म्हणाला होता की, भारतात अजूनही सरावासाठी मोठ्या क्षमतेचे तलाव नाहीत. जे तलाव आहेत ते करोना काळात बंद पडले आणि उरलेले फंड नसल्याने सुरू नाहीत. याचा परिणाम मुलाच्या करिअरवर होऊ नये हा एकमेव हेतू देश सोडून दुबईत स्थायिक होताना होता असंही आर. माधवन म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here