मुंबई : जगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अशी ख्याती असलेल्या रॉबर्ट डाउनी ज्युनिअरची एकेकाळी इतकी क्रेझ होती की चाहत्यांच्या त्याच्यावर उड्या पडायच्या. आयर्न मॅन या नावानेही रॉबर्ट हॉलिवूडमध्ये ओळखला जातो. पडद्यावर नेहमीच डॅशिंग भूमिकेत दिसणारा रॉबर्ट प्रसिध्दीच्या झोतात असतानाच व्यसनाच्या विळख्यात अडकला. काही काळ त्याचं करिअरही धोक्यात आलं. पण त्यातूनही सावरत रॉबर्टने फूट प्रिंट नावाची निसर्गसंवर्धनाची चळवळ सुरू केली.

राॅबर्ट डाऊनी ज्युनियर

आज रॉबर्ट डाउनी या प्रख्यात अभिनेत्याची आठवण काढण्याचं कारणही खास आहे. बऱ्याच दिवसांनी रॉबर्टने इन्स्टापेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आणि फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद तर झाला पण त्याची अवस्था पाहून मात्र रॉबर्टप्रेमी चिंतेत पडले आहेत. उंचापुरा, भारदस्त, पिळदार शरीरयष्टीच्या रॉबर्टवर फिदा असलेल्या चाहत्यांना या व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, घटलेलं वजन आणि म्हातारपणाच्या खुणा पाहून धक्का बसला आहे. पण उमर को गोली मारो म्हणत रॉबर्टनने दंडावरील डोले शोले दाखवले आहेत.

Elon Musk ने पत्नीसोबत Threesome केलेलं? जॉनी डेपचा आरोप

रॉबर्ट डाउनी यंदा ५७ वर्षाचा झाला असून वयानुसार होणारा बदल त्याच्यातही झाला आहे. पण त्याचे चाहते मात्र त्याचं वाढतं वय स्वीकारायला तयार नाहीत असं त्याच्या व्हिडिओला आलेल्या कमेंटमधून दिसत आहे. रॉबर्टने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने फूट प्रिंट हे त्याच्या उपक्रमाचा लोगो असलेला टीशर्ट घातला आहे. गुळगुळीत दाढी करून आपले बाहू दाखवत त्याने हा व्हिडिओ केला असला तरी चाहत्यांचे लक्ष मात्र त्याच्या पातळ झालेल्या केसांकडे आणि बारीक झालेल्या तब्येतीकडेच लागून राहिलं आहे.


एका चाहत्याने असं म्हटलं आहे की तू खूप म्हातारा दिसत आहेस. तू खरंच रॉबर्ट डाउनी ज्युनिअरच आहेस का असं म्हणत एका चाहत्याने रडवेल्या चेहऱ्याचा इमोजी पोस्ट केला आहे. काही जणांनी रॉबर्टला, तू अशक्त दिसत असल्याचं म्हटलं आहे. पण या कमेंटच्या गर्दीत एकाने रॉबर्टला तू अजूनही हँडसम आहेस असं म्हणत कौतुक केलं आहे.

श्वेता बच्चन नेहमी माहेरीच का राहते, पतीसोबत सुरू आहे का वाद?


यशाच्या शिखरावर असताना अनेक वादविवादामध्ये गुरफटलेल्या रॉबर्टच्या कमबॅककडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. त्यांची इच्छा पूर्ण करत रॉबर्ट लवकरच स्क्रीनवर दिसणार आहे. ख्रिस्तोफर नोलनच्या एका सिनेमात रॉबर्ट सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्या या सिनेमाची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here