मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण आहे. त्यांची जोडी चाहत्यांना देखील खूप आवडते आहे. हे दोघं जण केवळ ऑनस्क्रीनच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात देखील खूपच धम्माल करताना दिसतात. सध्या रणवीर सिंह त्याच्या आगामी ‘जयेशभाई जोरदार’सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमातील ‘फायर क्रॅकर’ गाणं प्रदर्शित झालं आहे. यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात रणवीरनं भर स्टेजवर त्याची बायको, दीपिका पादुकोण हिचं भरभरून कौतुक केलं आहे.

काय म्हणाला रणवीर सिंह?

‘जयेशभाई जोरदार’ सिनेमातील ‘फायर क्रॅकर’ गाणं रिलीज झालं आहे. गाण्याच्या लाँचिंगवेळी झालेल्या कार्यक्रमात रणवीरनं खूपच धम्माल करताना दिसला आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणवीरनं कुणाला तरी लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता. त्या व्यक्तीनं रणवीरला लग्न झालं नसल्याचं सांगितलं. त्यावर रणवीरनं लगेचच उत्तर दिलं की, ‘लकी आहेस की तू…’ रणवीर असं म्हणाल्यावर तिथं असलेले सर्वजण हसू लागतात. त्यानंतर रणवीर सिंह म्हणतो की, ‘खरं तर लकी मी आहे… माझ्या घरात तर लक्ष्मी आहे…जय झुलेलाल, जय झुलेलाल…’

किस्सा- जेव्हा लता मंगेशकरांनी लग्नात गायला दिलेला नकार

आम्ही दहा वर्षे एकत्र

रणवीरनं पुढं सांगितलं की, ‘ जेव्हापासून बेबी माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हा पासून माझं आयुष्य मार्गी लागलं आहे. ती माझ्या आयुष्यात २०१२ ला आली. आता बेबी आणि मी दहा वर्षे एकत्र आहोत.’

रणवीर सिंह दीपिका

ती माझी फायरक्रॅकर

त्यानंतर रणवीरनं पुढं सांगितलं की,’ ती माझी फायरक्रॅकर आहे. ती खऱ्या अर्थानं फायर क्रॅकर आहे. ही गोष्ट सगळ्यांनाच मान्य असेल. २०१२…विचार करा दहा वर्षे झाली आहेत. किती भाग्यशाली आहे मी. ती जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहे, तेव्हापासून माझं आयुष्य खऱ्या अर्थानं मार्गी लागलं आहे. केवळ मार्गीच नाही तर आयुष्याची गाडी सुसाट धावत आहे.’

साधं आयुष्य जगणाऱ्या अरिजीत सिंगची आहे कोट्यवधींची संपत्ती

सेल्फी घेणाऱ्यांबाबत रणवीर म्हणाला

या सिनेमाच्या प्रमोशनवेळी होत असलेल्या कार्यक्रमात अनेक विद्यार्थांनी, चाहत्यांनी रणवीरला गराडा घातला. अनेकांना रणवीरबरोबर सेल्फी घ्यायचा होता. त्या गर्दीतून वाट काढत कसाबसा रणवीर स्टेजवर जाऊन पोहोचला. तिथं जाऊन तो म्हणाला, ‘ तुम्हाला माहिती आहे एक काळ असा होता की जेव्हा मी लोकांना भेटत होतो. तेव्हा शेकहँड केला जायचा, आलिंगन दिलं जायचं,पप्पी घेतली जायची. पण आता ना शेकहँड केलं जात, ना आलिंगन दिलं जातं…आता फक्त सेल्फी घेतला जातो. लोकांना फक्त सेल्फीच हवा असतो.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here