वृत्तसंस्था, कोक्राझर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त ट्वीट (Jignesh Mevani On Modi) करणाऱ्या गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्यांना आणखी एका प्रकरणात लगेचच अटक करण्यात आली. महिला पोलिसावरील हल्लाप्रकरणात ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
मेवाणी यांना १९ एप्रिलला गुजरातमधील पालनपूर येथून अटक करून आसाममधील कोक्राझर येथे नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना प्रथमवर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसीय पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवारी याप्रकरणी जामीन मंजूर केल्यानंतर महिला पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणात लगेचच अटक करण्यात आली. गुवाहाटी विमानतळावरून अतिरिक्त पोलिस अधीक्षकांसमवेत कोक्राझर येथे मेवाणी यांना नेत असताना ही घटना घडली असून याबाबत बारपेटा रोड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तीन दिवसांची पोलिस कोठडी मागण्यासाठी झालेल्या सुनावणीवेळी या हल्ल्याबाबत नमूद करण्यात आले नव्हते. जामीन मिळेपर्यंतही त्याबाबत उल्लेख नव्हता. मात्र, जामीन मिळाल्यानंतर लगेचच पुन्हा अटक करण्यात आली, असे मेवाणी यांचे वकील अंगशुमन बोरा यांनी सांगितले.