Raj Thackeray | राज ठाकरेंच्या सभेच्या तयारीसाठी मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे गेल्या आठवड्याभरापासून औरंगाबादमध्ये तळ ठोकून आहे. तर गेल्या आठवड्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन सभेबाबत सूचना केल्या.

 

Raj Thackeray feature
Raj Thackeray | पोलिसांनी सुरुवातीपासूनच या सभेला परवानगी नाकारली होती. तरीही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेने सभेची तयारी सुरु केली होती.

हायलाइट्स:

  • पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास बंदी असेल
  • राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला एक लाखांची गर्दी होण्याचा अंदाज
औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून औरंगाबादमध्ये १ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या सभेबाबत आता नवा पेच निर्माण झाला आहे. कारण, औरंगाबाद पोलिसांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे. त्यानुसार २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू असेल. या आदेशामुळे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास बंदी असेल. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. औरंगाबाद पोलिसांच्या या आदेशामुळे मनसेला राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या होणारी सभा रद्द करावी लागणार आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि मनसेचे नेते याबाबत काय भूमिका घेतात, हे आता पाहावे लागेल. (Aurangabad police imposed section 144 in city for 13 days)
‘बाळासाहेब ठाकरेंच्या सभेचं रेकॉर्ड कोणीही मोडू शकणार नाही’, शिवसेनेचं राज ठाकरेंना चॅलेंज
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला एक लाखांची गर्दी होईल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी सुरुवातीपासूनच या सभेला परवानगी नाकारली होती. तरीही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेने सभेची तयारी सुरु केली होती. रविवारी मनसेकडून सभेच्या ठिकाणी पूजन करून व्यासपीठाच्या उभारणीला सुरुवात झाली होती. मात्र, आता जमावबंदीच्या आदेशामुळे सभेसाठी जोमाने कामाला लागलेल्या मनसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. आता मनसेप्रमुख राज ठाकरे यावर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पत्रिका ‘राज दरबारी’ दाखल, टीझरही तयार; परवानगी नसतानाही सभेची जंगी तयारी

मनसेकडून औरंगाबादमध्ये कोणत्याही परिस्थितीत सभा होणारच, असा पवित्रा घेण्यात आला आहे. पोलिसांनी सभेसाठी सुचविलेला पर्यायी जागेचा प्रस्तावही मनसेने नाकारला होता. मात्र, आता जमावबंदीचा आदेश झुगारून मनसे औरंगाबादमध्ये सभा आयोजित करणार का, हे पाहावे लागेल. तसे घडल्यास पोलीस राज ठाकरे आणि मनसैनिकांवर काय कारवाई करतात, हेदेखील पाहावे लागेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mns chief raj thackeray rally in aurangabad on 1 may 2022 police imposed section 144 in city
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here