औरंगाबाद: राज्यात भोंग्यावरून वातावरण तापले असताना औरंगाबादमध्ये एका रेल्वे पोलिसाला भोंग्यावरून गाणे वाजवणे चांगलेच महागात पडले आहे. अजान सुरू असताना एक पोलीस उपनिरीक्षकाने मोठ्या आवाजात गाणे लावले म्हणून त्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे कृत्य करणारा रेल्वे पोलिसात उपनिरीक्षक असल्याचे समोर आले आहे. किशोर गडप्पा मलकूनाईक असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर यांनी घराच्या मागे असलेल्या मस्जिदच्या दिशेने नमाज पठन सुरु असताना मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर गाणे लावले. त्यामुळे यातून २ धर्मात तेढ निर्माण होऊ शकते आणि वेगवेगळ्या गटात शत्रूत्व वाढू शकते, त्यामुळे ही क्रिया चिथावणीखोर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.

Raj Thackeray rally: राज ठाकरेंची सभा रद्द होणार? औरंगाबादमध्ये १३ दिवसांची जमावबंदी लागू
अशी झाली कारवाई…

रेल्वे सुरक्षा बल मध्ये पोलीस उप. निरीक्षकाच्या जबाबदार पदावर असताना सुद्धा त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचे आदेशाचे उल्लंघन करुन त्यांच्या राहत्या घराच्या मागे असलेल्या मस्जिदच्या दिशेने लाऊड स्पिकर ठेवून नमाज पठन करण्याच्या वेळी मोठ्या आवाजात गाणी वाजवली. त्या भागातील काही नागरिकांनी याबाबत नियंत्रण कक्षात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर यांचा ‘गुरू’योग हुकणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here