मुंबई : रणवीर सिंग म्हटलं की चट्ट्यापट्ट्याच्या पँट, पिसं लावलेली हॅट, लाल पिवळ्या रंगाचे कोट, गुलाबी बूट इतकंच नव्हे तर स्कर्ट आणि कोटचं कॉम्बिनेशन करून कार्यक्रमात फिरणारा त्याचा लूक हमखास आठवतो. रणवीरच्या या अशा अतरंगी फॅशनची नेहमीच चर्चा होत असते. अनेक अॅवार्ड फंक्शनलाही ग्लॅमरस बायको दीपिकासोबत रणवीर अशा फनी गेटअपमध्ये आला आहे . त्याच्या या हटके फॅशनफंडामुळे दीपिकाही लाजून लाजून चूर झाल्याचं आपण पाहिलं आहे. आता पुन्हा रणवीरने अनेकांच्या नजरा खेचून घेतल्या आहेत, त्या असाच एक अतरंगी ड्रेस घालून. आता हा ड्रेस त्याने का घातला आणि या फंकी ड्रेसमध्ये त्याने नेमके काय चाळे केले हे बघून चाहत्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.


सध्या रणवीर सिंगची चर्चा आहे ती त्याच्या आगामी सिनेमा जयेशभाई जोरदार या सिनेमामुळे. १३ मे रोजी हा सिनेमा स्क्रिनवर येणार असला तरी यापूर्वीच झळकलेल्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला. क्रिक्रेटर कपिल देव यांची बायोग्राफी असलेल्या ८३ या सिनेमाला अपेक्षित यश न मिळाल्याने रणवीरच्या पुढच्या हिटची मदार जयेशभाई जोरदार या सिनेमावरच आहे. त्यामुळेच रणवीर या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रात्रंदिवस एक करत आहे.

PHOTOS: शिल्पा शेट्टीची OTTवर दमदार एंट्री

रणवीर सिंह दीपिका

रणवीरने या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रंगीबेरंगी पायजमा, पिवळे बूट आणि फुलाफुलांचा शर्ट घालून प्रमोशन फंडा केला आहे. जयेशभाई जोरदार हा सिनेमा तर भरपूर मनोरंजन करेलच पण त्याआधी रणवीरने प्रमोशन करतानाच चाहत्यांना मनोरंजनाची पर्वणी दिली आहे. अर्थात रणवीरने या अतरंगी ड्रेसमध्ये ज्या काही मजेशीर गोष्टी केल्या आहेत ते बघून चाहत्यांना हसायला संधी मिळाली आहे.


Video- ‘ती तर माझ्या घरची लक्ष्मीच’ रणवीर सिंगचं दीपिकासाठीचं प्रेम पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

जयेशभाई जोरदार या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कारमधून येताच सगळ्यांच्या नजरा रणवीरकडे वळल्या नसत्या तरच नवल. कारमधून जेव्हा रणवीर उतरला तेव्हा तिथे जमलेले लोक त्याच्याकडे पाहतच राहिले. रंगीत ड्रेसमध्ये कारमधून बाहेर आलेल्या रणवीरने सगळ्यांना थोडं मागं सरकण्याचा इशारा केला. त्यानंतर रणवीर कारच्या बॉनेटवर चढला आणि एकाहून एक स्टायलीश पोझ देत त्याने जयेशभाई सिनेमाचं भरभरून प्रमोशन केलं. जमलेल्या छायाचित्रकारांनी रणवीरचा हा फनी लूक कॅमेऱ्यात कैद केला. सध्या सिनेमाच्या चर्चेसोबतच रणवीरचे अतरंगी लूकमधले चाळेही व्हायरल होत आहेत. रणवीर मात्र चाहत्यांच्या हसण्याकडे लक्ष न देता प्रमोशनचा हा फनी अवतार एन्जॉय करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here