किम जोंग उन यानं आम्ही आमच्या देशाची अणवस्त्रांची क्षमता वेगानं वाढवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत उत्तर कोरियाची अधिकृत वृत्तसंस्था केसीएनएनं वृत्त दिलं आहे. सोमवारी उत्तर कोरियाच्या सैन्याच्या स्थापना दिवसानिमित्तानं परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परेड रात्री १० वाजता सुरु झाली होती.
उत्तर कोरियाच्या सरकारच्या दाव्यानुसार जपानविरोधात लढण्यासाठी १९३२ मध्ये गुरिल्ला सैन्याची स्थापना करण्यात आली होती. त्याच्या स्थापना दिवसा निमित्तानं आयोजित कार्यक्रमात २० हजार सैनिक परेडमध्ये सहभागी झाले होते. उत्तर कोरियानं त्या परेडमध्ये २५० वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त दाखवण्यात आली होती. यामध्ये हवासोंग-८ आणि हवासोंग-१७ चा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
उत्तर कोरियानं यावेळी आंतरखंडीय क्षेपणास्त्राचं प्रदर्शन केल्याचा दावा करण्यात आला आहे. या परेडसाठी उत्तर कोरियातील टायडोंग नदीवर दोन पूल बांधण्यात आले होते. उत्तर कोरियात किम जोंग उन सत्तेत आल्यापासून ९ वेळा लष्करी सामर्थ्य दाखवणाऱ्या परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. या परेडनंतर उत्तर कोरियानं आमच्याकडे अपराजित राहू अशा प्रकारचं लष्करी सामर्थ्य असून आम्हाला दुर्लक्षित केल जाऊ शकत नाही असा इशारा देण्यात आला आहे. आता अमेरिका आणि दक्षिण कोरिया काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.