चैत्र शुद्ध षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा सुरू झाली असली तरी शेवटच्या दिवशी गर्दी वाढली. १५ ते १८ एप्रिल या कालावधीत भाविकांच्या गर्दीचा आजवरचा विक्रम नोंदविला गेला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी ‘जय हो महाकाली चांदावासिनी…’चा गजर केला. मंदिराच्या विश्वस्त आशा महाकाले यांनी महाआरतीनंतर गाभाऱ्यात स्थापन करण्यात आलेला देवीचा घट हलविला. दहीभात शिंपडले आणि यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू झाला.
१९ एप्रिलला यात्रा संपली तरी २४ एप्रिलपर्यंत भाविकांची वर्दळ मंदिर परिसरात कायम होती. यंदाही यात्रेत पोतराज आकर्षणाचे केंद्र ठरले.
Elon Musk यांच्याकडे Twitter चा फुल कंट्रोल, होणार ‘हे’ ५ मोठे बदल
‘आस अधुरी राहू नये म्हणून…’
‘दोन वर्षे देवीच्या दर्शनाला येता आले नाही. यंदा संधी मिळाली. सरकारकडून अजूनही करोनाची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. पुढल्या वर्षी यात्रा रद्द झाल्यास मनातील आस अधुरीच राहणार आहे. म्हणून यंदाच सहकुटुंब देवीच्या दर्शनाला आलो’, असे मराठवाड्यातील भाविकांनी सांगितले.
भाविकांच्या गर्दीचा चढा आलेख…
वर्षे——– भाविक
२०१६—– ७५ हजार
२०१७—- १ लाख २० हजार
२०१८— १ लाख ४० हजार
२०१९—- १ लाख २५ हजार
२०२०—- यात्रा रद्द
२०२१— यात्रा रद्द
२०२२– ३ लाख ५० हजार