करनो व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी भारताच नव्हे तर अनेक देशांत लॉकडॉऊन घोषित करण्यात आला आहे. सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले असून या लॉकडाऊनचा अनेकांना बसला आहे. पण लॉकडाऊन मुळं सर्वात जास्त फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसला असल्याचं केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
‘करोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बसलाय. गेल्या १०० दिवसांत त्यांनी एकही विदेश दौरा केला नाही. हे भारताच्या इतिहासात सुर्वण अक्षरात लिहिलं जाईल’,असं म्हणत एका प्रकारे मोदींना टोला लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी देखील केआरकेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला होता. लॉकडाऊन ही मोदींनी केलेली सर्वात मोठी चूक आहे असं त्यांनं म्हटलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times