इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये इमरान खान (Imran Khan) यांची सत्ता गेल्यानंतर शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) पंतप्रधान झाले आहेत. इमरान खान सत्तेत असताना ब्रिटनला उपचारासाठी गेलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) पाकमध्ये परतवण्याचे मार्ग खुले झाले आहेत. शरीफ सरकारनं नवाज शरीफ यांच्यासाठी पासपोर्ट जारी केला आहे. नवाज शरीफ यांनी तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून काम केलं आहे. इमरान खान यांची सत्ता असताना नवाज शरीफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाई सुरु करण्यात आली होती.
चीनमध्ये करोनाचा उद्रेक, ‘या’ शहरात आठवड्यामध्ये तीनवेळा चाचणीचे आदेश
नवाज शरीफ नोव्हेंबर २०१९ ला लाहोर उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर उपचारासाठी लंडनला गेले होते. नवाज शरीफ यांना अल-अजीजिया मिल्स भ्रष्टाचार प्रकरणात जामीन मिळाला होता. शरीफ यांना या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

पाकिस्तानात आता सत्ता बदल झाल्यानंतर नवाज शरीफ यांना पाकिस्तानात परत येण्याचा मार्ग खुला झाला आहे. शाहबाज शरीफ सरकारनं नवाज शरीफ यांच्यासाठी पासपोर्ट जारी करण्यात आला आहे.

नवाज शरीफ यांनी २०१९ मध्ये ब्रिटनमध्ये जाण्यापूर्वी लाहोर हायकोर्टाला पाकिस्तानात परत येण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर त्यांनी चार आठवड्यांमध्ये कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्याचं आश्वासन दिलं होतं. आता नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर परत येत आहेत. शाहबाज सरकार आता नवाज शरीफ यांच्यावरील प्रलंबित खटल्यासंदर्भात काय निर्णय घेणार हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.
उत्तर कोरियाच्या किम जोंगचं शक्तीप्रदर्शन, अमेरिकेसह दक्षिण कोरियाला सूचक इशारा
पाकिस्तानमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर पीपीपी पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी नवाज शरीफ यांची भेट घेण्यासाठी ब्रिटनला गेले होते. पाकिस्तानमध्ये शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात बिलावल भुट्टो सहभागी होणार आहेत. बिलावल भुट्टो यांनी नवाज शरीफ यांच्या भेटीनंतर मंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. बिलावल भुट्टो यांना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रिपद देण्यात येणार आहे. पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून हिना रब्बानी खार यांना संधी देण्यात आली आहे.

दुसरीकडे इमरान खान यांनी पाकिस्तानमधील शाहबाज शरीफ यांच्या सरकारच्या विरोधात खऱ्या स्वातंत्र्यांची लढाई सुरु करण्याचे समर्थकांना आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here