औरंगाबाद : ‘आज १५ मिनिटांचा कार्यक्रम होता पण यामध्ये इतक्या मागण्या पुढे आल्या की रात्री अर्थमंत्र्यांना झोप येणार नाही’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भर कार्यक्रमात अजित पवारांना कोपरखळी मारली आहे. ते औरंगाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
आज औरंगाबादमध्ये पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षण खातं किती अवघड आहे, यावर भाष्य केलं. राज ठाकरेंकडून हकालपट्टी; आता मनसेचा माजी जिल्हाध्यक्ष करणार भाजपमध्ये प्रवेश शरद पवार म्हणाले की, ‘मला सांगितलं की १५ मिनिटांसाठी या आणि पुस्तक वाटप करा. शिक्षकांचे आमदार असलेल्या आमदारांचं गणित एवढं कच्चं असेल असं वाटलं नाही. कारण आता १ तास झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तक वाटप करणं सोपं नाही. मी शिक्षण मंत्री होतो. काही काळ होतो पण हे एवढं अवघड काम कुठलं नाही. कारण, शिक्षण संघटना येतात मुद्दे मांडतात त्यांना हो किंवा नाही म्हणता येत नाही. पुढे मंत्री मंडळ बदललं तेव्हा मी म्हटलं की मला शिक्षण खातं नको. मला कृषी खातं द्या’
आज १५ मिनिटांचा कार्यक्रम होता पण त्यांनी एवढ्या मागण्या केल्या की आज अर्थमंत्र्यांना झोप लागणार नाही, असंही शरद पवार म्हणाले.