सांगली : मिरजेच्या गुंडेवाडी जवळ स्कूल बस पलटी होऊन ५ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर स्कूल बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ५ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

असा झाला अपघात…

मिरज शहरातील तनुबाई खाडे इंग्लिश स्कुलची विद्यार्थी वाहतूक करणारी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी शाळा सुटल्यानंतर शाळेत शिकणारे कळंबी, सिद्धेवाडी, गुंडेवाडी इथल्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी नेहमीप्रमाणे शाळेचे स्कूलबस निघाली होती. यामध्ये २५ विद्यार्थी होते. काही विद्यार्थ्यांना सोडून स्कूल बस हे सिद्धेवाडी ते खंडेराजुरी रस्त्यावर असणाऱ्या कुरणे मळा या ठिकाणी पोहोचली असता एका रिक्षाला ओव्हरटेक करताना बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि स्कूल बस हे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली.

राणा दाम्पत्याला भाजपने दिली सुपारी, अनिल गोटेंचा गंभीर आरोप; सुपारी का दिली? तेही सांगितले…
आसपासच्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना बसमधून काढले बाहेर…

विद्यार्थ्यांचा आरडाओरडा सुरू झाल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या आसपासच्या ग्रामस्थांनी धाव घेत गाडीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढत जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. यामध्ये ५ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर या अपघाताच्या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या अपघातामध्ये स्कूल बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर यापुढे अशी घटना घडणार नाही, असा विश्वास शाळा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स पाठोपाठ चेन्नई IPLमधून बाहेर झाली का? जाणून घ्या नवे समीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here