० ‘दसवी‘ चित्रपटातील भूमिका साकारताना काय आव्हानं होती?
– मी अशी भूमिका साकारेन याची कल्पना माझ्यासह कुणीच केली नव्हती. अशा प्रकारची भूमिका स्वीकारणं हेच पहिलं आव्हान होतं. माझ्यातल्या अभिनेत्रीला आव्हान देईल अशाच प्रकारच्या भूमिका मला साकारायच्या होत्या, ते सत्यात उतरलं. दिग्दर्शकानं विचारलं तेव्हा मनात धाकधूक होती, पण मी भूमिका स्वीकारली. दिग्दर्शकाचे विचार बदलतील की काय अशी भीती होती. पण तसं काही झालं नाही. या भूमिकेसाठी मी १५ किलो वजन वाढवलं होतं. लहेजा शिकावा लागला. या सगळ्या बाजू सांभाळून माझी भूमिका प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायचा प्रयत्न केलाय. हे माझं काम प्रेक्षकांना आवडत असल्याची पोचपावती मिळतेय.

० तुझ्या दहावीच्या आठवणी सांग.
– फार काही चांगल्या नाहीत. अभ्यास, टेन्शन आणि बरंच काही असा माहोल होता. माझा तर वाढदिवससुद्धा दहावीच्या परीक्षेदरम्यान आला होता. त्यामुळे तो वाढदिवस टेन्शनमध्येच गेला. दुसऱ्या शाळेत जाऊन अनोळखी व्यक्तींमध्ये पेपर लिहिणं, हे कठीण असतं.
फोटोत दडलंय भारतातल्या स्त्रीचं दु:ख; ‘माई’मधील या सीनची सोशल मीडियावर चर्चा
० तू साकारलेल्या भूमिकेला राजकीय अंग आहे, ती लकब भूमिकेत उतरवण्यासाठी काय केलं?
– मी सगळं काही संहितेतच शोधलं. माझ्या भूमिकेचे विविध कंगोरे मी संहितेतच शोधले. विम्मो ते विमलादेवी चौधरीचा प्रवास दाखवायचा होता. तिच्या आयुष्यातील बदलांना पूर्णपणे न्याय देऊन हा प्रवास स्क्रीनवर दाखवायचा होता. या सगळ्याचा सखोल अभ्यास केला.


० ओटीटीवर विविध वयोगटातल्या अभिनेत्रींसाठी भूमिका लिहिल्या जात आहेत, याबद्दल तुला काय वाटतं?
– हा अभिनेत्रींसाठी सर्वोत्कृष्ट काळ आहे. अर्थात, यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागलाय. हा टप्पा गाठेपर्यंत अनेक वर्षं सरली. आता हरप्रकारच्या भूमिका लिहिल्या जात आहेत. त्यामुळे काम करायला मजा येतेय. आम्हा अभिनेत्रींसाठी यासारखा दुसरा कोणता चांगला काळ असूच शकत नाही.
नवीन ट्विस्ट! देवमाणूस मालिकेत ‘खतरनाक’ माणसाची एन्ट्री
० ओटीटीवर (ओव्हर द टॉप) अभिनेत्रींना चांगल्या भूमिका मिळत आहेत. असं चित्र बॉलिवूडमध्ये दिसायला किती वेळ लागेल असं तुला वाटतं?
– असं काही नाही. ‘डर्टी पिक्चर’सारख्या महिलाकेंद्री सिनेमांची निर्मिती झालीय. फक्त याचा मोठ्या पडद्यावर वेग कमी आहे. तसंच वेगवेगळ्या स्वरुपांमध्ये आणि अधिक संख्येनं कलाकृतींची निर्मिती होतेय. जसं की, व्यावसायिक चित्रपट, ओटीटीसाठी चित्रपट, वेब सीरिज. असं करताना विभिन्न विषय दिसणारच. सगळ्या स्वरुपांमध्ये महिलाकेंद्री कलाकृती दिसायला लागल्यावर प्रेक्षक आणि आम्ही कलाकारसुद्धा कंटाळून जाऊ.

० तू ओटीटीवर अनेक भूमिका साकारल्या आहेस, त्या सगळ्या भूमिकांनी तुला काय दिलं?
– प्रत्येक पात्रानं संधी दिली. या संधी माझ्यातली अभिनेत्री समृद्ध होण्यासाठी उपयोगी पडल्या. या माध्यमानं माझ्याकडून वैविध्यपूर्ण काम करुन घेतलं. मोठ्या पडद्याकडून जे मिळालं नाही ते सगळं ओटीटीनं दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here