मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी कोठडीत हीन वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर आता मुंबई पोलीस आयुक्तांकडून थेट पुराव्यासह उत्तर देण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवनीत राणा यांचा पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करत मुंबईत धडकलेल्या आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कोठडीत पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली तसेच मागासवर्गीय असल्याने रात्रभर पाणी दिले गेले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तसे पत्रच त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले होते. पण यावर आता मुंबई आयुक्तांनी थेट पुराव्यासह उत्तर दिलं आहे.

जामिनासाठी प्रयत्न करणाऱ्या राणा दाम्पत्याची पुन्हा निराशा; कोठडीतील मुक्काम वाढला
पोलीस आयुक्तांनी व्हिडिओ शेअर करत नवनीत राणा यांनी केलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचं म्हटलं आहे. ट्वीट शेअर करताना पोलिसांनी ‘Do we say anything more’ अशी कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा शेजारी बसले असून त्या चहा पिताना दिसत आहे. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप कितपत खरे? यावर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here