‘नेमप्लेट’ बदलण्यासाठी शाहरुख खानने खर्च केले २० लाख रुपये
यशचा हिंदीतील आवाज
KGF 2 या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये यशसाठी सचिन गोळेनं आवाज दिला आहे. सचिन गेल्या १७ वर्षांपासून डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. याआधी त्यानं अनेक दाक्षिणात्य सिनेमांसाठी डबिंग केलं आहे. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिननं या सिनेमाशी संबंधित अनेक मनोरंजक किस्से सांगितले आहेत. मुलाखतीमध्ये सचिननं सांगितलं की, याआधी आलेल्या KGF 1 सिनेमासाठी त्यानंच डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. त्याची निवड खुद्द यशनं केली होती.
यशला KGF2 हिंदीमध्ये डब नव्हता करायचा

सचिननं या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘केजीएफ २ हा सिनेमा फक्त कन्नडमध्ये रिलीज व्हावा अशी यशची इच्छा होती. परंतु बाहुबली सिनेमाला हिंदीमध्ये मिळालेल्या लोकप्रियता पाहून तो केजीएफ हिंदीमध्ये डब करायला तयार झाला. परंतु यशसाठी आवाज कोण देणार हा मोठा प्रश्न होता. त्यासाठी जो आवाज हवा होता तो जास्त खर्जामधील नको होता आणि उंच पट्टीमधला ही नको होता. तसंच बोलणारी व्यक्ती ही अस्सल मुंबईकर ज्या स्टाईलनं बोलतो तसं बोलणारी हवी होती. मी याआधीही यशसाठी काही सिनेमे डब केले होते. जे त्यानं इंटरनेटवर पाहिले. त्याला माझा आवाज आवडल्यानं मलाऑडिशनसाठी बोलावलं. त्यानंतर मला त्यानं या सिनेमाच्या डबिंगसाठी फायनल केलं.’
केजीएफ २ च्या डबिंगसाठी किती वेळ लागला
केजीएफ १ सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. जेव्हा हा सिनेमा हिट ठरला तेव्हा केजीएफ २ साठी सचिनचीच निवड झाली. सचिननं सांगितलं की, ‘या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टमध्ये आधी पहिल्या पार्टमध्ये काम केलेले अनेकजण होते.’ सचिननं पुढं सांगितलं की, ‘निर्मात्यांनी मला सांगितलं की जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा येऊन डबिंग कर. मला याची कल्पना होती. त्यामुळे या डबिंगसाठी माझं सर्वोत्तम दिलं आहे. या सिनेमाचं डबिंग रोज ४ ते ५ तास करत होतो. परंतु केजीएफ हा मोठा प्रोजेक्ट होता. त्यामुळे मला यामध्ये कोणतीही चूक करायची नव्हती. कारण माझा आवाज सिनेमाच्या हिरोसाठी होता. या सिनेमाचं डबिंग मी एका आठवड्यात पूर्ण केलं.’
फोटोत दडलंय भारतातल्या स्त्रीचं दु:ख; ‘माई’मधील या सीनची सोशल मीडियावर चर्चा

वायलैंस वायलैंस डायलॉग प्रसिद्ध
या सिनेमातील ‘वायलैंस वायलैंस’ हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला. त्याबद्दल सचिनला विचारलं असता त्यानं सांगितलं की, ‘त्या डायलॉगसाठी त्याला २० टेक्स घ्यावे लागले होते. हिंदीमधील डायलॉगचा रिव्ह्यू यशनं स्वतः आणि दिग्दर्शक प्रशांत यांनी घेतला होता. त्यानंतरच सिनेमाचं डबिंग केलं गेलं.’
अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांना दिलाय आवाज
सचिननं केवळ यशला आवाज दिला नाही तर याआधी त्यानं धनुषच्या हिंदी सिनेमांसाठी आवाज दिला आहे. याशिवाय त्यानं रजनीकांत यांच्या काही जुन्या सिनेमांना,संदीप किशन आणि दुलकर सलमान यांच्या सिनेमांनाही आवाज दिला आहे. सचिन केवळ डबिंग आर्टिस्ट नाही तर तो स्वतःही उत्तम अभिनेता आहे. अभिनय करून उदरनिर्वाह होत नसल्यानं त्यानं २००५ मध्ये डबिंग करायला सुरुवात केली.