शिर्डी : ‘सोमय्यांचा गाडीवर मारलेला दगड आणि राणांवर फेकलेल्या बोटल्स सीसीटीव्हीत दिसत आहेत. एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये कसे वागवत आहेत हे दिसतं आहे. मग असे बोलून संजय राऊत कशाला वातावरण खराब करताय. संजय राऊत यांनी डीवचण्याचे काम करू नये’, अशा शब्दात माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांवर टीका केली आहे.

राज्यात निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती थांबवता येऊ शकते. यासाठी राज्य सरकारला सद्बुद्धी येवो अशी प्रार्थना माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी साईबाबा चरणी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहकुटुंब साई समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होते.

नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं पुराव्यासह उत्तर, थेट CCTV व्हिडिओ केला ट्वीट
‘संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते मात्र…’

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. मात्र, कधीही विकासावर बोलत नाहीत. मुख्यमंत्री बारा कोटी जनतेसाठी काय चांगले काम करतात याची मांडणी त्यांनी करावी. मात्र, सकाळी उठून केवळ जनतेला संभ्रमात ठेवण्यासाठी संजय राऊतांना नेमले आहे. सकाळची प्रेस महाराष्ट्राच्या विकासावर व्हावी अशी संजय राऊत आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.’ असंही यावेळी बावनकुळेंनी म्हटलं आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

– राज्यात भारनियमन होणार नाही इतकी क्षमता तिन्ही कंपन्यांमध्ये आहे. मात्र, त्यासाठी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि योग्य नियोजनाची गरज

– जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये केंद्र सरकारच्या कंपन्या २२ दिवसांचा कोळसा द्यायला तयार होत्या. ऊर्जा मंत्री आणि वित्तमंत्र्याच्या भांडणात नियोजन करता आले नाही.

राज ठाकरेंकडून हकालपट्टी; आता मनसेचा माजी जिल्हाध्यक्ष करणार भाजपमध्ये प्रवेश
– फडणवीस सरकारमध्ये विजेच्या बाबतीत योग्य नियोजन झाले. आमच्या काळात राज्य लोडशेडिंग मुक्त होते. ४५ लाख शेतकऱ्यांना २८ हजार कोटी रुपयांची वीज दिली.

– आता राज्याची परिस्थिती चांगली असताना राज्य अंधारात का गेले? याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची. आता लोकांची अवस्था सहन करण्याच्या पलीकडे असून शेतकरी हैराण…

– राज्य सरकार चालवणाऱ्या लोकांनी संयम ठेवून सरकार चालवावे…

– एकीकडे मिटकरी काहीही बोलतात, दुसरीकडे राणांनी फक्त मला हनुमान चालीसा म्हणायची आहे, असंच म्हटलं.

– मला कोणी असं म्हणालं असतं तर मी त्यांच्यासाठी टाळ मृदुंग, जेवणाची देखील व्यवस्था केली असती

– फडणवीस सरकारच्या काळात कधीही असे वातावरण निर्माण झाले नाही

– भावना व्यक्त केल्या तर भावनेचा आदर सरकारने करायचा असतो. मात्र, आता राज्याच्या संस्कृतीला छेद बसला असून केवळ व्यक्तिगत राजकारण सुरू आहे.

Heat Wave Alert : राज्यासाठी पुढचे ४ दिवस धोक्याचे, ‘या’ भागात भयंकर उष्णता वाढणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here