जळगाव : अल्पवयीन असल्यापासून तर मुलगी सज्ञान होईपर्यंत तिच्यावर तब्बल ८ वर्षापर्यंत अत्याचार मुलीला घरातून पैसे चोरून आण अन्यथा तुझे फोटो व्हायरल करू अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २०१४ ते १९ एप्रिल २०२२ घडलेल्या याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सोमवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ८ वर्षांपासून ते आजपर्यंत रितेश सुनिल बाविस्कर (रा. जुना सातारा, भुसावळ) याने तरुणी १४ वर्षांची असताना ती अल्पवयीन आहे. हे त्याला माहिती असताना देखील तरूणी व तिच्या मैत्रीणी यांचे शाळेत केव्हातरी फोटो काढून ते समाजात व शाळेत व्हायरल करेल अशी धमकी देऊन तरूणीस मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून त्याच मोटारसायकलवर बंटी (रा.भुसावळ) व राहुल (रा.भुसावळ) यांना बसवून इंजीनघाट परीसरात घेऊन जाऊन तरुणीसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच तरुणीच्या उजव्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी व २०० रूपये तसेच डाव्या हातातील बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली.

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा
तू तुझे घरातून पैसे चोरून आण नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल…

शोभा सुनिल बाविस्कर व नंदिनी राहूल कोळी (रा. टिटवाळा मुंबई) यांनी देखील तरुणीस ‘तु तुझे घरातुन पैसे चोरून आण नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल’ अशी धमकी दिली. उर्वेश पाटील (रा. भुसावळ) याने संशयित आरोपी शोभा सुनील बाविस्कर हिच्याशी संगणमत करून शोभा बाविस्कर हिच्या लग्नासाठी ५० ते ६० हजाराची मागणी केली. पीडित तरुणीने घाबरून ५० हजार रुपये त्यांना दिले. रितेश सुनील बाविस्कर याने तरुणीसोबत वेळोवेळी शारीरिक संबध प्रस्थापित करून तीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तरुणीची ७ ग्रॅम सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली.

याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात रितेश सुनील बाविस्कर, शोभा सुनील बाविस्कर, नंदिनी राहूल कोळी, सुनील बाविस्कर, उर्वेश पाटील, बंटी, राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास अरुण सोनार हे करीत आहेत.

नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं पुराव्यासह उत्तर, थेट CCTV व्हिडिओ केला ट्वीट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here