kirit somaiya | सीआयएसएफने कालच यावरून मुंबई पोलिसांना इशारा दिला आहे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे सीआयएसएफने मुंबई पोलिसांना कळवल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता.

हायलाइट्स:
- खार पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या बनावट एफआयआरबाबत तक्रार
- जवळपास दीड तास त्यांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती
खार पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या बनावट एफआयआरबाबत तक्रार नोंदवली. जवळपास दीड तास त्यांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी बाहेर येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही आमचा जबाब नोंदवला आहे. उद्या आम्ही राज्यपालांना भेटू. संजय पांडे यांनी माझ्या बोगस एफआयआरच्या आधारे कारवाईला सुरुवात केली होती. त्यावर माझी सही नव्हती. तरी पोलिसांनी त्याआधारे कारवाईला सुरुवात केली. मुंबई पोलीस, ठाकरे सरकार आणि शिवसेना घाबरते म्हणून माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. एफआयआर चुकीची असून त्यावर माझी स्वाक्षरी नाही, पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला.
रात्रीच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर आगपाखड, म्हणाले
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : police doing video shooting while recording bjp kirit somaiya statement in khar police station mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network