अहमदनगर : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली तसेच मागासवर्गीय असल्याने रात्रभर पाणी दिले गेले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. याला मुंबई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ट्वीट करून उत्तर दिले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्वीट करून यासंबंधी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांचा दाखल देत राणा यांना टोला लगावला आहे.

यासंबंधी रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘गुजरातमधील काँग्रेस जिग्नेश मेवाणी आमदार यांना एकामागोमाग एक गुन्ह्यात अटक करून भाजपकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्यांच्याकडे जातीचं बोगस नाही तर अस्सल सर्टिफिकेट आहे, तरी त्यांनी ना जातीचं हत्यार बाहेर काढलं ना वॉशरुमला जाऊ न दिल्याची तक्रार केली. विचारधारेशी तडजोड नाही!’

नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं पुराव्यासह उत्तर, थेट CCTV व्हिडिओ केला ट्वीट
रोहित पवार यांनी राणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करत राणा यांनी मुंबईत आल्यावर मुख्यमंत्र्यांवर आक्रमक टीका केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अटेकत असताना पोलिसांकडून अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा आरोप राणा यांनी केला होता.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी गुजरातमध्ये मेवाणी यांना अटक करण्यात आली आहे. पहिल्या गुन्ह्यात त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना आणखी एका प्रकरणात लगेचच अटक केली. महिला पोलिसावर हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अशा दोन घटनांचा एकमेकांशी संबंध साधत पवार यांनी हे ट्वीट केले आहे.

राज ठाकरेंकडून हकालपट्टी; आता मनसेचा माजी जिल्हाध्यक्ष करणार भाजपमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here