पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कराची विद्यापीठात झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २ जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी स्फोटाचं कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार व्हॅनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक देखील बोलवण्यात आलं होतं.
कराची विद्यापीठातील व्हॅनला लागलेल्या आगीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एक पाढंऱ्या रंगाची व्हॅन जळताना दिसून येते. संबंधित व्हॅन ही कराची विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाजवळ उभी होती. मात्र, या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानातील कराची विद्यापीठात एका व्हॅनचा ब्लास्ट झाला. यामध्ये ५ लोकांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले आहेत. व्हॅनमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.
सिंध विभागाचे पोलीस महानिदेशक मुश्ताक अहमद महार यांनी मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्याशी या घटनेसंदर्भात फोनवरुन चर्चा केली. मुश्ताक अहमद महार यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ही घटना दुपारी अडीचच्या दरम्यान घडली आहे.
दुसरीकडे काबूलमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून शिक्षणसंस्थांच्या आवारामध्ये बॉम्बस्फोट होण्याच प्रमाण वाढलं आहे. अफगाणिस्तानात शिया मुस्लीम समुदायाचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी एप्रिल महिन्यात बॉम्बस्फोट झाले आहेत. अफगाणिस्तामध्ये शिया मुस्लीम समुदायाविरोदात इस्लामिक स्टेटकडून हल्ले केले जात असल्याचा दावा करण्यात आला होता.