मुंबई : ‘ती गाडी मोदींची जरी असती तरी गाडीवर चप्पल आणि दगड पडल्याच असत्या कारण शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण आहे, अशा शब्दात शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. राजद्रोह गुन्हातील आरोपींना न्यायालय दंड लावून सोडणार असेल तर शिवसैनिंकांच्या फेकलेल्या चपल्लांचा हिशेबसुद्धा बंटी बबलीकडून घ्यावा, असंही यावेळी त्या म्हणाल्या.

दीपाली सय्यद पुढे म्हणाल्या की, ‘राणा दाम्पत्यांच्या पोटात दुखू लागले आहे. अरे बाबांनो, न्यायालयीन कोठडी आहे. फाईव्ह स्टार हॉटेल नाही. मशिदीवरील भोंग्यांबाबत न्यायालयीन आदेशाचे पालन होणार. आपल्या घरचे कायदे चालणार नाहीत.’

नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं पुराव्यासह उत्तर, थेट CCTV व्हिडिओ केला ट्वीट
यावेळी बोलताना दिपाली सय्यद यांनी राणा दाम्पत्यानंतर, किरीट सोमय्यांचे खेळ आणि मशिदीवरील भोंग्यांचा विषय छेडला. ‘राणा दाम्पत्य तुरुंगात गेल्यानंतर त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलची सुविधा हवी असल्यासारखी तऱ्हा झाली आहे. त्यांना घुटमळत आहे. पोलीस त्रास देताहेत. ते फाईव्ह स्टार नाही तर तुम्ही न्यायालयीन कोठडीत आहेत, हे सांगण्याची आता वेळ आली आहे. तसेच किरीट सोमय्या हे जरा काही झालं की दिल्ली, जरा काही झालं की मोदी यामध्ये गुरफटलेले आहेत, यांना लोकशाही माहितच नाही का ?’

नवनीत राणांच्या चहा पितानाच्या व्हिडिओवर रोहित पवारांनीही दिला दाखला, ट्वीट करत म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here