सिंधुदूर्ग : कणकवली वैभववाडी देवगड मतदारसंघांचे भाजप आमदार नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात देवगड आनंदवाडी इथे निषेधाचा बॅनर लागला आहे. गावात आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी असा बॅनरमधील मसुदा असून कमळ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात नितेश राणेंनी केलेल्या भाषणात आनंदवाडी गावाचे बदनामीकारक वक्तव्य केले, त्याचाच निषेध करणाऱ्या फलकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

देवगड तालुक्यातील कमळ चषक स्पर्धेदरम्यान नितेश राणे यांनी आनंदवाडी गावाची बदनामी केल्याचं बॅनरवर लिहलं आहे. आनंदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञाताने हा बॅनर लावला आहे. देवगड हा नितेश राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे नितेश राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नवनीत राणांच्या चहा पितानाच्या व्हिडिओवर रोहित पवारांनीही दिला दाखला, ट्वीट करत म्हणाले…
विशेष म्हणजे कमळ चषकाच्या उद्घाटनाच्या भाषणात देवगडमधील आंनदवाडी गावाची बदनामी होईल असे वक्तव्य केलं असल्याचं म्हणत आनंदवाडी गावाने एकमताने निषेध करत आनंदवाडी रस्त्याकडे जाणाऱ्या ठिकाणी निषेधाचे फलक लागल्याने देवगडसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

Heat Wave Alert : राज्यासाठी पुढचे ४ दिवस धोक्याचे, ‘या’ भागात भयंकर उष्णता वाढणार
काय म्हणाले होते नितेश राणे?

सिंधुदुर्गात “म्याओ म्याओ” ड्रग्जची विक्री होते असं वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देवगडमधील आनदवाडीत केलं. यावेळी आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी, देवगड, कणकवलीमधील तरुण पिढी चुकीच्या मार्गाने जात असून “म्याओ म्याओ” ड्रग्ज १५ ते २० रुपयांना तरुणांना मिळतो. या वक्तव्याचा निषेध करत देवगड मधील आनंदवाडी ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गावात प्रवेश बंदी केली आहे.

‘त्या गाडीत मोदी जरी असते तरीही फोडली असती’, दीपाली सय्यद यांची जहरी टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here