मुंबई: महाराष्ट्रात करोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत आत २१० नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५७४ इतकी झाली आहे. आज दिवसभरात करोनाच्या १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे राज्यात १८८ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
करोनाची लागण झालेल्या १३ रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यातील १० रुग्ण मुंबईतील होते तर पुणे, पनवेल आणि विरार येथील प्रत्येकी एक रुग्ण होता. मृतांत ९ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. एकूण १३ मृतांपैकी ६ जण ६० वर्षांवरील, ५ रुग्ण ४० ते ६० वर्षे या वयोगटातील तर दोन रुग्ण ४० वर्षांच्या आतील होते. १३ पैकी ११ रुग्ण मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा आजारांनी ग्रासलेले होते, असे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. राज्यात करोनामुळे आतापर्यंत ११० जणांचा मृत्यू झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times