Sharad Pawar | शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा एकदा कानपिचक्या दिले आहेत. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवाद पसरवत असल्याचा आरोप केला होता.
Sharad Pawar and Raj Thackeray
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: शिवाजी महाराजांनी उभे केलेले राज्य भोसलेंचे नव्हते तर ते रयतेचे राज्य होते. म्हणून तीनशे ते चारशे वर्षांनंतरही त्या राज्याची चर्चा होते. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव का घेतले जाते, यासाठी महाराष्ट्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र वाचला पाहिजे, प्रबोधनकार ठाकरे समजले पाहिजेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांची फिरकी घेतली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. नास्तिकपणाच्या आरोपाला पवारांचं सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले, ‘मी माझ्या देवधर्माचं प्रदर्शन करत नाही’ राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षक, प्राध्यापकांच्या मुप्टा या संघटनेच्या रौप्यमहोत्सव अधिवेशनात शरद पवार यांनी वरील वक्तव्य केले. ‘मी जाहीर भाषणात शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाही अशी माझ्यावर टीका केली जाते. तथापि, शाहु-फुले-आंबेडकर यांचे नाव का घेतो हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. शिवरायांचे नाव हे तुमच्या-माझ्या अंतःकरणात आहे. अनेक राजे होऊन गेले पण तीनशे-चारशे वर्षांनंतरही लोकांच्या मनात शिवाजी महाराजांचे अढळ स्थान आहे’, असे पवार म्हणाले. ज्यांनी इतिहास घडवला त्यांचे स्थान अंतःकरणात आहे, त्यांचे नाव सांगायची गरज नाही, असे सांगत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना टोला लगावला. ‘आरं भाषण करणं सोपंय बाबा’, अजित पवार यांची राज ठाकरेंवर पुन्हा सडकून टीका ‘सर्वसामान्यांचा विकास करायचा असेल तर फुले यांचे विचार विसरून कसे चालेल. शाहूराजे आगळेवेगळे राजे होते. खोट्या गोष्टी त्यांना आवडत नव्हत्या. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. संविधान इतके मजबूत आहे की आपल्या बाजूच्या देशात अशांतता आहे. मात्र भारतात शांतता नांदत असून ते संविधानाचे महात्म्य आहे. भारतातील सिंचन व्यवस्थेचे सर्वांत आधी काम बाबासाहेबांनी केले आहे. त्याचे भाक्रा नांगल धरण हे उदाहरण आहे’, असे शरद पवार म्हणाले.