मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे खासदार नवनीत राणा आता नव्याने अडचणीत येण्याची शक्यता आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी रात्री ट्विट करून नवनीत राणा यांचे युसूफ लकडावालाशी असलेले आर्थिक कनेक्शन उघड केले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ८० लाखांचे कर्ज घेतले होते, असे राऊत यांनी म्हटले होते. मग सक्तवसुली संचलनालयाने (ED) या प्रकरणाची चौकशी का केली नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता.

त्यानंतर आता या व्यवहाराकडे राज्यातील तपासयंत्रणांच्या नजरा वळल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही चौकशी सुरु झाल्यास राजद्राहोच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या नवनीत राणा यांच्या अडचणीत मोठी भर पडण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याकडून किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून युसूफ लकडावाला याच्याकडून घेतलेल्या कर्जाबाबत अद्यापपर्यंत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
कोठडीतून नवनीत राणांचं पोलिसांना सनसनाटी पत्र, संजय राऊतांवर अ‍ॅट्रोसिटी लावण्याची मागणी
मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून लवकरच नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील व्यवहाराबाबत तक्रार दाखल केली जाऊ शकते. त्याआधारे आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करू शकते. या पार्श्वभूमीवर आता नवनीत राणा काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संजय राऊत यांचा नेमका आरोप?

युसुफ लकडावाला याचा कोठडीत मृत्यू झाला आहे. लकडावाला याला सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्याचा संदर्भ देत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तीकडून कर्ज घेतले असल्याने हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ठरतो. त्यामुळेच या प्रकरणात चौकशी झाली आहे का, याचे उत्तर ईडीने द्यायला हवे, असे राऊत यांनी नमूद केले आहे.

मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणावर खासदार नवनीत राणा ठाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here