नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत अब्दुल सत्तार यांनी प्रभू हनुमानाचं नाव घेत शिवीगाळ केल्याचा दावा केला. या व्हिडिओत अब्दुल सत्तार हे पोलिसांच्या उपस्थितीत काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करतानाही दिसत आहे.
नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
‘शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार प्रभू हनुमानाबद्दल अर्वाच्च शिवीगाळ करत आहेत. उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणतात ना? तर या अब्दुल सत्तार यांना तुरुंगात डांबून दाखवा,’ असं आव्हान नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. राणे यांच्या आव्हानानंतर सत्ताधारी पक्षाकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही. आमदार राणे यांनी शेअर केलेल्या या वादग्रस्त व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी ‘मटा ऑनलाइन’ करत नाही.