मुंबई : एक दोन नव्हे तर गेली १३ वर्षांपासून टीव्हीवर सुरू असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. आता मालिका जितकी लोकप्रिय तितकच तिच्यावर लक्ष ठेवणारे प्रेक्षकही जास्त असतात. विनोदीअंगाने मांडणी करताना एखादा सामाजिक,कौटुंबिक संदेश देण्यात या मालिकेने बाजी मारली आहे.. गेल्या एक तपाहून अधिक काळाच्या या प्रवासात मालिकेतील अनेक कलाकार सोडून गेले, पण मालिका अखंड सुरू आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा

या मालिकेवर नेहमीच कौतुकाचा वर्षाव होत असतो. पण नुकतीच या मालिकेच्या निर्मिती टीमने चक्क प्रेक्षकांसमोर हात जोडून माफी मागितली आहे. मालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एका चुकीसाठी दिलगिरी व्यक्त करत चुकीची दुरूस्ती केली आहे. अनावधनाने झालेल्या या चुकीला भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनीही समजून घेतले असले तरी अशी चूक पुन्हा होणार नाही याची काळजी मालिकेच्या टीमला घेणं गरजेचं असल्याचा सल्लाही प्रेक्षकांनी कमेंटमध्ये दिला आहे.

केवळ Will Smith च नाही तर अनेक हॉलिवूड कलाकारांवर आहे हिंदू धर्माचा पगडा

मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमकडून अशी काय चूक झाली की निर्मात्यांना माफी मागावी लागली? तर मालिकेत गेल्या दोन आठवड्यांपासून म्युझिकल नाइटचा ट्रॅक सुरू आहे. याच अनुषंगाने मालिकेत काही वैशिष्ट्यपूर्ण गाण्यांविषयी चर्चा सुरू असल्याचे सीन दाखवण्यात आले. यामध्ये बाबूजी चंपकलाल हे जेठालाल आणि बागा यांना ए मेरे वतन के लोगो या गाण्याची माहिती देत असताना या गाण्याच्या प्रदर्शनाचे वर्ष चुकीचे सांगताना दाखवले गेले.

PHOTOS: राधाच्या भूमिकेबद्दल काय म्हणतेय रुमानी?

तारक मेहता का उल्टा चश्मा

वास्तविक १९६२ च्या भारत चीन युध्द झाले. भारतीय जवानांच्या त्यागासाठी कवी प्रदीप यांनी लिहिलेलं हे गाणं लता मंगेशकर यांनी १९६३ साली गायलं. हे गाणं गात असताना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे डोळे पाणावल्याचा किस्सा आजही सांगितला जातो.तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत या गाण्याच्या प्रदर्शनाचे वर्ष १९६५ असं सांगण्यात आलं. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मालिकेच्या टीमने या चुकीबद्दल प्रेक्षकांची माफी मागितली.

लता मंगेशकर आणि कवी प्रदीप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here