मुंबई : बॉलिवूडमधील ड्रीम गर्ल अर्थात हेमा मालिनी या त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. ८० ते ९०च्या दशकामध्ये हेमा मालिनी यांनी सिनेमा पडद्यावर अधिराज्य गाजवलं होतं. केवळ इतकंच नाही तर प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केलं होतं. हेमा मालिनी यांच्या अभिनयावर केवळ प्रेक्षकच नाही तर त्यांचे सहकलाकार देखील फिदा होते.

धर्मेंद्र यांच्यापासून जितेंद्र, संजीव कुमार यांच्यावर देखील हेमा मालिनी यांची छाप पडली होती. केवळ इतकंच नाही तर धर्मेंद्र यांनी दारूच्या नशेत हेमा मालिनी यांचं घर गाठलं होतं, इथंपासून ते जितेंद्र यांच्याबरोबर त्यांच लग्न होणार होतं अशा अनेक बातम्या तेव्हा चांगल्याच गाजल्या होत्या. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्यांच्या आधी राज कुमार यांनी हेमा मालिनी यांना लग्नासाठी मागणी घातली होती. जाणून घेऊया या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल.

लता मंगेशकरांच्या गाण्यावर केली मोठी चूक, ‘तारक मेहता…’ ने हात जोडून मागितली माफी

राजकुमार आणि हेमा मालिनी

डान्सर म्हणून हेमा मालिनी यांनी केली सुरुवात

हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात १९६३ मध्ये तामिळ सिनेमात डान्सर म्हणून केली होती. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी ‘सपनों के सौदागर’ या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. भलेही बॉलिवूडमध्ये जम बसवायला हेमा मालिनी यांना वेळ लागला परंतु त्याआधीच त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. केवळ प्रेक्षकांच्या मनातच नाही तर सहकलाकारांच्या मनातही हेमा मालिनी यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यामध्ये राज कुमार यांचाही समावेश होता.

राज कुमार यांना आवडायच्या हेमा मालिनी

राज कुमार हे ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते होते. त्याकाळात धर्मेंद्र यांची देखील खूप चर्चा होती. त्याच काळात हेमा मालिनी अभिनयाच्या क्षेत्रात त्यांचं बस्तान बसवायचा प्रयत्न करत होत्या. असं सांगितलं जातं की जेव्हा राज कुमार यांनी हेमा मालिनी यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ते त्यांच्या प्रेमात पडले होते. परंतु या गोष्टीची माहिती हेमा मालिनी यांना अजिबात नव्हती.

हेमा मालिनी

हेमा मालिनी यांना मिळवून दिलं सिनेमात काम

राज कुमार यांनी हेमा मालिनी यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना ‘लाल पत्थर’ हा सिनेमा मिळवून दिला. या सिनेमासाठी आधी वैजयंतीमाला यांच्या नावाचा विचार सुरू होता. परंतु राज कुमार यांनी सर्व निर्मात्यांसमोर हेमा मालिनी यांचं नाव सुचवलं तेव्हा सर्वजण हैराण झाले होते. कारण त्या काळात वैजयंतीमाला यांची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होत होती तर हेमा मालिनी या नवोदित अभिनेत्री होत्या. अर्थात राज कुमार यांनी शिफारस केल्यामुळे हेमा मालिनी यांना हा सिनेमा मिळाला. अशीही चर्चा होती की, हा सिनेमा करायला हेमा मालिनी यांनी सुरुवातील नकार दिला होता. कारण त्यांच्या मनात शंका होती. परंतु नंतर त्यांनी सिनेमा करायला होकार दिला. या सिनेमात राखी आणि विनोद मेहरा देखील होते. परंतु राज कुमार आणि हेमा मालिनी ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या सिनेमात हेमा यांनी पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिका केली होती.

हेमा मालिनी

राज कुमार यांनी घातली लग्नाची मागणी

जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा राज कुमार आणि हेमा मालिनी या जोडीची खूप चर्चा होती. त्याचवेळी राज यांनी हेमा मालिनी यांना लग्नाची मागणी घातली होती. राज यांनी थेट लग्नाची मागणी घातल्यामुळे हेमा मालिनी यांना मोठा धक्का बसला होता. परंतु हेमा मालिनी यांनी राज कुमार यांना नकार दिला. नकार देताना त्यांनी सांगितलं की, मी राज कुमार यांची मोठी चाहती आहे आणि त्यांना चाहती म्हणूनच रहायचं आहे. हेमानं लग्नाला नकार दिल्यामुळे राज कुमार यांना खूप दुःख झालं होतं.

Dharmaveer : हा अभिनेता साकारतोय हिंदूहृदयसम्राटांची भूमिका


राज कुमार यांनी एअर होस्टेसशी केलं लग्न

कालांतरानं राज कुमार यांनी जेनिफर पंडित नावाच्या अँग्लो इंडियन महिलेशी लग्न केलं. जेनिफर या पेशानं एअर होस्टेस होत्या. तर हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्न केलं. या दोघांची भेट १९७० मध्ये ‘तुम हंसी मै जवां’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here