पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्क्होलाच यांच्यात द्वीपक्षीय चर्चा होईल. भारत जर्मनी इंटर गर्वमेंटल कन्सलटेशनच्या सहाव्या फेरीची चर्चा दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये होईल. यावेळी दोन्ही देशांचे महत्त्वाचे मंत्री देखील उपस्थित असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीतील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार आहेत. डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडेरिकसेन यांच्या निमंत्रणावरुन कोपेनहेगनला नरेंद्र मोदी रवाना होतील. मोदी डेन्मार्कमध्ये भारत-नॉर्दिक कराराच्या दुसऱ्या बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर नरेंद्र मोदी ४ मे रोजी फ्रान्सला धावती भेट देतील.
नरेंद्र मोदी ४ मे रोजी फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट देतील. भारत आणि फ्रान्स यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होईल. मॅक्रॉन नुकतेच फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी मॅक्रॉन याचं अभिनंदन करतील.
रशिया यूक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाला दोन महिने पूर्ण झालेले आहेत. भारतानं रशिया आणि यूक्रेननं चर्चेतून प्रश्न सोडवावा अशी भूमिका घेतली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान नुकतेच दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी देखील रशिया आणि यूक्रेन यांच्या युद्धावर चर्चा झाली होती. आता नरेंद्र मोदी तीन देशांचा दौरा करणार असल्यानं त्यावेळी देखील या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.