पाकिस्तानचे पत्रकार कामरान यूसूफ यांच्यामते चीनच्या नागरिकांच्या मृत्यूमुळं पाकिस्तान सरकारवरील दबाव वाढणार आहे. पाकिस्ताननं गेल्या काही वर्षापासून दहशतवाद आणि सुरक्षेच्या मुद्याला तोंड देत आहे. कराची विद्यापीठात स्फोट घडवणारी शारी बलूच पाकिस्तानच्या इतिहासातील आत्मघातकी स्फोट घडवणारी दुसरी महिला ठरली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार बीएलएनं ईमेलच्या माध्यमातून बुरखा घालून स्फोट घडवणाऱ्या महिलेचा फोटो शेअर केला आहे. शारी बलूच हिचा दोन मुलांसोबतचा फोटो शेअर करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला दुजोरा देण्यात आलेला नाही. द एक्स्प्रेस ट्रिब्यूननं दिलेल्या बातमीनुसार शारी बलूच ही एम.फिलची विद्यार्थिनी होती. दुपारी १२.१.० वाजता तिनं ट्विटरवर तिच्या मित्रांना अलविदा म्हटलं होतं.
पाहा व्हिडीओ
शारी बलूचच्या मृत्यूनंतर तिच्या पतीनं एक ट्विट केलं आहे. पत्नीच्या मृत्यूवर अभिमान व्यक्त करत ते एक निस्वार्थी काम होतं असं त्यानं म्हटलं आहे. हैबितान बशीर बलूच असं शारी बलूचच्या पतीचं नाव आहे. महरोच आणि मीर हसन यांना त्यांची आई महान होती या विचारानं अभिमान वाटेल, असं ट्विटमध्ये हैबितान बलूचनं लिहिलं आहे.
चीनविरोधात रोष का?
चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोला बलूचिस्तानमधील नागरिकांचा विरोध आहे. सीईपीसीचा काही भाग बलूचिस्तानमध्ये जात असल्यानं बलूचिस्तानमधील लोकांकडून विरोध सुरु आहे. चीन आमच्या संसाधनांची चोरी करत असल्याचा आरोप बीलएकडून करण्यात आला आहे. चीनचे नागरिक आणि त्यांचं संरक्षण करणाऱ्या पाकिस्तानी सुरक्षा दलांवर बीएलएकडून हल्ले करण्यात येत आहेत. शारी बलूच देखील बीलएलएच्या माजीद ब्रिगेडची सदस्य होती. चीनच्या तीन महिला प्राध्यापकांचा मृत्यू झाल्यानं पाकिस्तानवरील दबाव वाढला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोषींना शिक्षा केली जाईल, असं म्हटलं आहे.