नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. नरेंद्र मोदी यांनी आपण गेल्या २ वर्षात २४ वी बैठक घेत असल्याचं म्हटलं आहे. करोना काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन काम केलं. केंद्र आणि राज्य एकत्र येणं ही करोनाच्या लढाईसाठी महत्त्वाची भूमिका होती, असं मोदी म्हणाले. करोना संसर्ग अद्याप संपलं नसून आपल्यासमोरील आव्हान कायम आहे. ओमिक्रॉन आणि त्याचे सब वेरियंटस गंभीर स्थिती निर्माण करत आहेत. आपण यूरोपमध्ये ते पाहात आहोत, असं नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवरुन गैर भाजप शासीत राज्यांना सुनावलं आहे. मोदींनी पेट्रोलचे (Petrol) भाजपशासीत राज्यातील दर आणि गैर भाजपशासीत राज्यांचे दर वाचून दाखवले. गुजरात आणि कर्नाटकनं कर कमी करुन हजारो कोटींचं नुकसान सहन केलं आणि त्यांच्या शेजारच्या राज्यानं या काळात हजारो कोटी कमावल्याचा उल्लेख मोदींनी महाराष्ट्राचं नाव न घेता केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
Video: बुरखाधारी महिलेनं कराचीत स्फोट घडवला, सुसाईड बॉम्बचा सीसीटीव्ही समोर
आपल्या देशात मोठ्या कालावधीनंतर शाळा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं पालक चिंतीत आहेत. काही शाळांमधील विद्यार्थी करोनबाधित झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, आता लहान मुलांना देखील करोना लस देण्यात येणार आहे, ही समाधनाची बाब आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. मार्च महिन्यात आपण १२ ते १४ वर्षातील मुलांसाठी करोना लसीकरणाला सुरुवात केली. ६ ते १२ वर्षाच्या मुलांसाठी कोवॅक्सिन लसीला परवानगी देण्यात आली आहे, असं मोदींनी म्हटलं.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी परवागनी सरकारनं दिली आहे. सर्व पात्र मुलांचं लसीकरण करणं आपली प्राथमिकता आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी आई वडील यांना सतर्क केलं पाहिजे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत आपल्याकडे तीन लाख करोना रुग्ण आढळून आले आहेत. आपल्या सर्व राज्यांनी करोनाच्या लाटेत सामाजिक आणि आर्थिक गोष्टींना गती दिल्याचं नरेंद् मोदी म्हणाले.आपले वैज्ञानिक आणि विशेषज्ञ राष्ट्रीय आणि जागतिक स्थितीवर लक्ष ठेवून आहे. करोनाच्या संक्रमणाच्या सुरुवातीपासून ते रोखण्यासाठी आपली प्राथमिकता राहिली आहे, असं मोदी म्हणाले. टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट ही आपली रणनीती राहिली पाहिजे, असं मोदी म्हणाले.
इमरान खानची सत्ता जाताच नवाज शरीफ यांना दिलासा, पाक सरकारचा मोठा निर्णय
गैर भाजपशासीत राज्यांना पेट्रोल डिझेलवरील करावरुन सूचना
जगात युद्धस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आपल्यासमोरील आव्हान वाढत चालली आहेत. जागतिक संकटांच्या काळात केंद्र आणि राज्यांमधील ताळमेळ वाढवण्याची आवश्यकता आहे. मात्र, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क नोव्हेंबर महिन्यात कमी केलं. राज्य सरकारांना देखील आवाहन करण्यात आलं काही राज्यांनी कर कमी केले तर काही राज्यांनी कर कमी केले नाहीत.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांनी केंद्र सरकारचं ऐकलं नाही. त्यामुळं त्या राज्यातील नागरिकांना महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं लागलं. नोव्हेंबरमध्ये जे करायचं होतं ते काम आता वॅट कमी करुन नागरिकांना दिलासा द्या, असं मोदी म्हणाले. गुजरात आणि कर्नाटक राज्यानं विक्रीकर कमी केल्याची माहिती देत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. चेन्नई, जयपूर, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोल किती किमतीला विकलं जात आहे,याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. यावेळी भाजप शासीत राज्यातील पेट्रोलचे दर नरेंद्र मोदींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here