नवी दिल्लीः देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून आता हा आकडा ७५०० वर गेला आहे. आतापर्यंत करोनाने २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. देशातील लॉकडाऊन वाढवायचा या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. पंजाब आणि ओडिशाने १ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तर भारतातील लॉकडाऊन घाईघाईत हटवल्यास करोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी व्यक्त केली.

देशात लागू झालेल्या लॉकडाऊनचा आजचा १८ वा दिवस आहे. देशात करोनाचे रुग्ण वाढत असले तरी अद्याप करोनाचा समूह संसर्ग झालेला नाही. करोनाचा संसर्ग हा स्थानिक पातळीवरच आहे आणि काही भागांमध्येच त्याचे रुग्ण आढळून येत आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केलं.

जगभरात १६ लाखांहून अधिक नागरिकांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर मृतांची संख्या १ लाखांवर गेली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशात शुक्रवारी करोनाचे रुग्ण वाढले. देशातील करोना रुग्णांची संख्या वाढून शुक्रवारी ७५१० वर गेली. तर २५१ जणांचा मृत्यू झालाय, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here