नागपूर : नागपूरमध्ये हत्या आणि आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे चाकूने वार करून आईचा खून केल्यानंतर मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

लीला विष्णू चोपडे (वय ७४) व श्रीनिवास विष्णू चोपडे (वय ५१), अशी मृतकांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास हे अभियंते होते. गेल्या काही महिन्यांपासून ते बेरोजगार होते. त्यामुळे ते तणावात राहायचे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लीला यांच्या पोटावर चाकूने वार केले. लीला यांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीनिवास यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

राज्यातल्या आणखी एका जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी लागू, वाचा काय आहेत नियम?
दरम्यान, लीला यांच्या मुंबईला राहणाऱ्या मुलीने लीला यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. प्रतिसाद मिळाला नाही. त्या सतत आईच्या मोबाईलवर संपर्क साधायच्या. प्रतिसाद मिळत नसल्याने मुलीने बोखारा येथे राहणारे नातेवाइक सागर प्रभाकर इंगळे (वय ३५) यांना घरी जाण्यास सांगितले. सागर हे हिंदुस्थान कॉलनी येथे आले. लीला यांच्या घराच्या दरवाजाला दरवाजाला कुलूप होते. त्यांनी आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. सागर यांनी धंतोली पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. कुलूप तोडून पोलीस घरात गेले. कुजलेलास्थितीत दोघांचे मृतदेह आढळले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केले. धंतोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सहा हजारांचा मोह महागात पडला, कारकून महिलेने कार्यालयातच केला धक्कादायक प्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here