मुंबई : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे २०२० मध्ये अनेक कलाकाराचं निधन झालं. त्यामध्ये प्रसिद्ध विनोदी अभिनेते जगदीप यांचाही समावेश आहे.जगदीप यांनी त्यांच्या करिअरमध्ये सुमारे ४०० सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यांनी केलेल्या अनेक भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. विशेष करून ‘शोले’ सिनेमातील सूरमा भोपाली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. जगदीप यांचा मुलगा जावेद जाफरी हा देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाच्या क्षेत्रात सक्रीय आहे. जावेदनं एका मुलाखतीमध्ये त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामध्ये त्यानं वडिलांचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवलं आहे.

बालपण त्यांना अनुभवता आलं नाही

जावेद जाफरीनं मुलाखतीमध्ये त्याच्या वडिलांच्या आठवणी सांगितल्या. त्यानं सांगितलं की, ‘ माझ्या वडिलांना नवव्या वर्षी घराची जबाबदारी घ्यावी लागली. फाळणीनंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब भारतामध्ये आलं. हे सर्वजण मुंबईत आले होते. त्यांच्याकडे काहीही नसल्यानं आईबरोबर रस्त्यावर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. लहानपणीच त्यांच्यावर जबाबदारी पडली. त्यामुळे लहानपण असं अनुभवता आलं नाही. त्यांच्याकडे खेळायला वेळ नव्हता. खेळायच्या ऐवजी ते काम करायला जायचे. त्यांना स्वतःला लहानपण अनुभवता आलं नव्हतं त्यामुळे आमच्या लहानपणात त्यांनी त्यांचं बालपण पाहिलं. आम्हाला जे हवं ते त्यांनी कायम दिलं.’

मला कोणालाही विसरायचं नाही, सिद्धार्थसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कियारा आडवाणी


देशाबद्दल प्रचंड प्रेम होतं

जगदीप यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जावेद यांनी सांगितलं की, ‘त्यांना देशाबद्दल खूप प्रेम होतं. आपल्या देशामध्ये असलेल्या विविधतेमधील एकतेबद्दल त्यांचा प्रचंड अभिमान होता. त्यांनी गुरुदत्त, बिमल रॉय, व्ही. शांताराम, मेहबूब यांच्यासारख्या अनेक दिग्गजांबरोबर काम केलं आहे. या सर्वांकडे खूप ज्ञान होतं. हे ज्ञान वडिलांनी त्यांच्याकडून घेतलं आणि आम्हा मुलांना दिलं. या सर्वांनी देशातील एकता टिकवून राहणारे सिनेमे बनवले. परंतु दुर्दैवानं आज हीच गोष्ट देशातून संपत चालली आहे. सध्याच्या काळात चांगले दिवस येतील, केवळ अशीच अपेक्षा आपण करू शकतो.’

म्हणून अक्षय-विद्याला ‘भूल भुलैया २’मध्ये घेतलं नाही

जावेद जाफरी आणि जगदीप

जावेद आणि त्याच्या मुलात फार संवाद नाही

जावेद जाफरीचा मुलगा मिजान यानं बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्याबद्दल सांगताना जावेद यांनी सांगितलं की, ‘माझे आणि वडिलांचे संबंध एखाद्या मित्राप्रमाणे होते. तर मिजान त्याच्या आईच्या जवळ जास्त आहे आणि तिच्याशीच सर्व गोष्टी तो शेअर करत असतो. आम्हा दोघांमध्ये केवळ औपचारिक संभाषण असतं. आमच्यात फार काही संवाद नाही. त्यामुळे तो कधीही त्याच्या रिलेशनबद्दल माझ्याशी बोलणार नाही.’ जावेद जाफरी लवकरच ‘नेवर किस युवर बेस्ट फ्रेंड सीझन २’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो डिज्नी प्लस हॉटस्टार त्या ‘इस्केप लिव’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here