औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी होणाऱ्या सभेबाबत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. काही वेळापूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यापूर्वी पोलीस उपायुक्त उज्वला वनकर यांनीसुद्धा मैदानाची पाहणी केली. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, काही वेळात पोलीस आयुक्त निखील गुप्ता या सुद्धा पत्रकारांशी बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकंदरीत आज राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. यामुळे राज्यभराच लक्ष लागून असलेल्या राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीबाबत पुढील काही तासांमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तसेच या सभेला परवानगी मिळाल्यास दंगली होऊ शकतात, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे जर सभा झाली तर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोळीबार प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर मनसे नेते बाळा नांदगावकर हे सध्या औरंगाबादमध्ये असून राज ठाकरेंची सभा होणारच असा नारा त्यांनी दिला आहे. इतकंच नाहीतर या मैदानाला इतिहास आहे म्हणून इथंच सभा होणार आहे. आमच्या नेत्यासमोर बाळासाहेबांचा आदर्श आहेत. आम्ही बाळासाहेबांसोबत बरोबरी करणार नाही. पण राज ठाकरेंचे ते काका आहे. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळले आहेत, असं बाळा नांदगावकर म्हणाले.