अहमदनगर : राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख आणि त्यांचे चिरंजीव उदयन यांच्या हत्येचा कट रचल्याची कथित ऑडिओ क्लीप समोर आली आले. त्याची चौकशी सुरू असताना नेवासा तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संशय व्यक्त करीत आघाडी सरकारवर आरोपही केला आहे.

विखे पाटील म्हणाले, मंत्र्याच्या सहायकावर गोळीबार आणि मंत्र्याच्या हत्येचा कट पहाता आघाडी सरकारमधील मंत्रीच आता सुरक्षित राहिले नाहीत, असे दिसते. असे असेल तर हे सरकार जनतेला कोणती सुरक्षा देणार? जे पेरले, तेच आता उगवत आहे. गुंडगिरीला कोणताही जात धर्म नसतो. मात्र, जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी तर हा प्रकार नाही ना?’ असा संशयही विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोळीबार प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्‍यावर झालेल्‍या हल्‍ल्यासंबंधी विखे पाटील म्हणाले, ‘राज्‍यात भाजप नेत्‍यांवर पोलिसांदेखत खुलेआम हल्‍ले होत आहेत. तरीही पोलीस गप्‍प बसण्‍याची भूमिका घेतात. हल्‍ल्‍याची चौकशी करायचे सोडून सोमय्या यांच्या जखमेची कसली चौकशी करता? राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. दशहतवाद्यांशी संबंध असलेले नबाब मलिक अजूनही मंत्री पदावर कायम आहेत. त्यामुळे गुंडाचे बळ वाढत असून जनतेला सहन करावे लागत आहे.’

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेसंबंधी ते म्हणाले, ‘सरकार राज ठाकरे यांना का घाबरत आहे. तुमचा कारभार जर पारदर्शक आहे, जनता आमच्या पाठीशी असल्याचे तुम्ही सांगता मग सभेला परवानगी का नाकारता? औरंगाबाद येथे शरद पवारांच्या उपस्थितीत शिक्षकांचा मेळावा झालेला चालतो मग राज ठाकरेंच्या सभेला लगेच जमावबंदीचे कारण सांगितले जाते? तुम्ही कितीही मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरी आता तुमच्या पापाचा घडा भरला आहे. आघाडी सरकारच्या भोंग्याचा आवाच बंद झाला म्हणून विरोधकांचे भोंगे बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार? औरंगाबादमध्ये हालचालींना वेग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण लवकरच विरोधकांचा समाचार घेण्यासाठी सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी खरेच मास्क काढून सभा घ्याव्यात, त्यांचे स्वागतच आहे. त्यांना खरे चित्र पाहायला मिळेल. आधी त्यांना स्वतःच्या मंत्र्यांचा समाचार घ्यावा लागेल. अन्यथा राज्यातील लोक त्यांचा समाचार घेतील.’

पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात, सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here