पुणे : वीजचोरी करणाऱ्या आकडे बहाद्दरांवर ‘महावितरण‘ने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली असून, पुणे, सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अनधिकृत वीजजोडणीचे सात हजार २२० आकडे काढून टाकण्यात आले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात तीन हजार आकडे टाकणाऱ्या वीजचोरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यासाठी वापरलेले पंप, केबल, स्टार्टर आदी साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, मागणीनुसार विजेचा पुरवठा करण्यात अनधिकृत आकडे अडथळा ठरत आहेत. त्यामुळे आकडेबहाद्दर वीजचोरांविरोधात महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या चार दिवसांपासून धडक कारवाईत सात हजाराहून अधिक ठिकाणी अनधिकृत आकडे टाकून वीजचोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यांतर्गत गणेशखिंड, रास्तापेठ आणि पुणे ग्रामीण मंडलामध्ये ५७३, बारामती ग्रामीण मंडलामध्ये २४३१, सोलापूर जिल्ह्यात ३०२१, सातारा जिल्ह्यात ७०३, सांगली जिल्ह्यात ४५७ आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३५ ठिकाणी आकडे आढळले असून, ते ताबडतोब काढून टाकण्यात आले आहेत. यापैकी बहुतांश आकडे कृषी वापरासाठी वीजचोरी करण्यास टाकण्यात आल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा होणे, वीजवाहिनी किंवा रोहित्रावरील भार वाढणे, रोहित्रामध्ये बिघाड होणे, विजेचे अपघात आदी प्रकार टाळले जात आहेत. आकडेमुक्त वीजवाहिन्यांसाठी ही कारवाई सुरू ठेवण्याच्या सूचना महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिल्या आहेत.

महागाईच्या झळा, वाहन पीयूसी महागले
पावणेआठ कोटींचा अनधिकृत वीजवापर उघड

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून वीजचोरीविरोधात नियमित कारवाईसह एक दिवसाच्या विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. या मोहिमांमध्ये आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सहा हजार ४२८ ठिकाणी सात कोटी ७१ लाख ४५ हजार रुपयांच्या अनधिकृत वीजवापराला चाप लावण्यात आला आहे. आकडे किंवा केबल टाकून वीजचोरी करताना अपघात होऊ शकतो. हा अपघात जीवघेणा ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे विजेची चोरी करण्यापेक्षा अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

Namaz Recitation: ‘मुंबईतील शिवाजी पार्कवर नमाज पठण करू द्या’; औरंगाबादच्या वकिलाने केली मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here