: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्याने उद्यानातील मुलांची गर्दी वाढत असल्याने मुलांचे आकर्षण असलेली फुलराणी आणि उद्याने बंद आहेत. मुलांच्या आनंदासाठी सर्व उद्यानातील जलाशयातील कारंजी आणि फुलराणी तातडीने सुरू करावी, अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

राज्य सरकारने सर्व नियम शिथिल केल्याने शहरातील उद्याने पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर उद्यान विभागाने सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रातील वेळाही वाढवल्या आहेत. उद्यानामध्ये पर्यटक आणि नागरिकांची गर्दी वाढत असताना पेशवे उद्यान, नानासाहेब पेशवे जलाशय, सरदार घोरपडे उद्यान, कर्वेनगरातील जावळकर उद्यानातील फुलराणी तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत.

काही उद्यानामध्ये असणारी कारंजी, खेळणी नादुरुस्त आहेत. त्यामुळे मुलांची निराशा होत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे फुलराणी आणि कारंजांची दुरवस्था झाली आहे. महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालून तातडीने सर्व उपक्रम पूर्ववत करावेत, या मागणीचे पत्र पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हृषिकेश बालगुडे यांनी महापालिकेला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here