मॉस्को :रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यामध्ये २४ फेब्रुवारीपासून युद्ध सुरु आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी जे यामध्ये हस्तक्षेप करतील त्या देशांविरोधात अणूबॉम्बचा वापर करण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. सेंट पीटर्सबर्गमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांना धमकी दिली आहे. रशिया आणि यूक्रेन प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्या देशांना विजेच्या वेगापेक्षा अधिक वेगानं प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.

खासदार बाळू धानोरकर यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, काहीच मिळालं नाही म्हणून…
पाश्चिमात्य देशांनी यूक्रेनमध्ये हस्तक्षेपक करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्याकडे शस्त्र आहेत. आम्ही त्या शस्त्रांबद्दल काही बोलणार नाही मात्र आम्ही करुन दाखवू असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. डेलीमेलनं प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार पुतीन यांनी अणूबॉम्बचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख त्याच दिशेनं होता. रशियानं गेल्या काही दिवसांमध्ये सरमत २ या अणवस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. त्या चाचणीसंदर्भात ते बोलत होते.

पुतीन यांनी रशियाच्या खासदारांना यूक्रेनवरील लष्करी कारवाईची माहिती दिली. आपलं सैन्यदल नक्कीच त्यांना दिलेलं ध्येय पूर्ण करेल, असा विश्वास पुतीन यांनी व्यक्त केला. रशियन सैन्य मोठ्या प्रमाणावर संघर्ष होऊ नये म्हणून लढत आहेत, असंही ते म्हणाले.
टीका झेलण्यासाठी आमचे खांदे मजबूत; संजय राऊतांच्या वक्तव्यावर न्यायालयाची टिप्पणी
यूक्रेन अणवस्त्र आणि रासायनिक शस्त्र बनवण्याची परवानगी मागत होता. रशियासाठी ते धक्कादायक ठरलं असतं, असंही ते म्हणाले. पाश्चिमात्य देशांनी यूक्रेनला आपला विरोधक बनवलं. यूक्रेन नेहमी रशियासोबत मित्राप्रमाणं राहिल होता. त्यांच्या स्वातंत्र्यापासून तो देश आपला मित्र राहिल याची काळजी घेतली. मात्र, यूक्रेन आपला विरोधक होईल अशी अपेक्षा केली नव्हती, असंही ते म्हणाले.

दरम्यान, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली होती. संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख कीवमध्ये यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. पुतीन यांच्याशी प्रदीर्घ चर्चेनंतरही तोडगा काढण्यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांना यश आलं नव्हतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here