इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्यावर टोमॅटो हल्ला सुरु होताच सुरक्षारक्षकांनी त्यांना घेरलं. मॅक्रॉन यांना टोमॅटो लागू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी एक छत्री उघडली. राष्ट्रपतींवर थेट हल्ला झाल्यानं घटनास्थळावर खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या घटनेनंतर मॅक्रॉन फुड मार्केटमधून निघून गेले. निवडणूक विजयाननंतर जनतेशी संवाद साधण्यासाठी पोहोचले होते.
इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्यावर सप्टेंबर २०२१ मध्ये अंडी फेकण्यात आली होती. मॅक्रॉन लियॉनमधील एका कार्यक्रमात फ्रान्सच्या गॅस्ट्रोनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. त्या घटनेचा व्हिडी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यापूर्वी जून २०२१ मध्ये इम्यॅनुएल मॅक्रॉन यांना एका व्यक्तीनं कानाखाली मारली होती. त्यावेळी देखील ते एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी मरीन ले पेन यांचा पराभव केला होता. निवडणुकीत मॅक्रॉन यांनी आरोग्य, महागाई आणि दरडोई उत्पन्न यासंदर्भातील मुद्यांना प्राधान्य दिलं होतं. फ्रान्सच्या ४.८० कोटी जनतेनं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान केलं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी यावेळी १२ उमेदवार रिंगणात होते. मात्र, प्रमुख लढत ही मॅक्रॉन आणि मरीन ले पेन यांच्यामध्ये होती. मरीन ले पेन यांचा पराभव करत मॅक्रॉन राष्ट्रपती पदावर दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत.
राष्ट्र्पतीपदाच्या निवडणुकीपूर्वी मॅक्रॉन यांच्याबद्दल जनतेमध्ये रोष होता. सेवानिवृत्तीवय वाढवण्याची योजना लागू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. महागाई या सारख्या मुद्यांमुळं मॅक्रॉन यांची लोकप्रियता घटेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र ते पुन्हा विजयी झाले आहेत.