ठाणे : भाजप नेते आणि नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक यांच्यावरील टांगती तालावर अद्याप कायम आहे. २७ एप्रिल रोजी त्यांच्या अटकपूर्व जामीनावर निर्णय होणार होता. मात्र, ठाणे न्यायालयाने या निर्णयासाठी आजची २८ एप्रिलची तारीख दिली आहे. आता गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीनावर आज निर्णय होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गणेश नाईक हे फरार झाले आहेत. पोलिसांकडून गणेश नाईक यांची शोध मोहीम सुरू आहे. याच दरम्यान गणेश नाईक यांनी आपल्या अटकपूर्व जामीनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी होणार आहे. न्यायालयाने २७ तारखेला दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आज सुनावणी केली जाणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर टांगती तलवार कायम आहे.

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार; मात्र ‘या’ असणार अटी-शर्ती
दरम्यान, गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबई येथील नेरूळ इथं बलात्कार आणि महिलेला धमकविण्याच्या बाबतीत गुन्हा दाखल झाला होता. यावर नेरूळ पोलिसांनी बलात्कार प्रकरणी गणेश नाईक यांची मेडिकल करणे गरजेचे असून त्यासाठी कस्टडी पाहिजे असल्याचे कोर्टाला सांगितले. तर बेलापूर पोलीस तपास अधिकारी यांनी धमकावण्यात आलेल्या गुन्ह्यात हत्यार जप्त करायचे आहे म्हणून कास्टडी मागितली होती. त्यामुळे गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन देऊ नका अशी विनंती कोर्टाला करण्यात आली होती. त्यानुसार आता न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

या प्रकरणी गणेश नाईक यांच्या वकिलांनी हा सर्व प्रकार संमतीने झाला आहे. त्यामुळे याला बलात्कार मानू नये असे न्यायालयात सांगितले. यावर युक्तिवाद करत असताना फिर्यादी यांच्या वकिलाने २०१० ते २०१७ च्या दरम्यान फिर्यादीच्या मनाविरुद्ध नाईक यांनी संबंध प्रस्तापित करत फिर्यादीवर बलात्कार केला गेला असल्याचा धक्कादायक खुलासा फिर्यादीच्या वकिलांनी केला आहे.

गणेश नाईक DNA चाचणीसाठी तयार

या प्रकरणात पोलिसांनी गणेश नाईक यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांची पोलीस कोठडी हवी असल्याचे न्यायालयात सांगितले होते. यावर गणेश नाईक यांनी आपल्या वकिलांमार्फेत मी डीएनए चाचणीसाठी तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन मिळणार किंवा नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय, डीएनए अहवालातून काय समोर येते, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महाराष्ट्र दिनाला राज आणि उद्धव ठाकरेंची जुगलबंदी रंगणार, आंबेडकरांचाही शांती मोर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here