सांगली : विष प्राशन करून थेट सांगली शहर पोलीस ठाण्यातच एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतुल गरजे पाटील असे या तरुणाचे नाव असून अतुल हा शहर पोलीस ठाण्यात साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तर एका महिला सावकाराच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून त्याने ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस ठाण्याच्या टेरेसवर आत्महत्या…

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणानंतर सांगली शहर पोलीस ठाणे पुन्हा एकदा हादरून गेले आहे. कारण शहर पोलीस ठाण्याच्या टेरेसवरचं एका तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अतुल गरजे पाटील (वय ३६) हा तरुण हा शहर पोलीस ठाण्यात गेल्या काही वर्षापासून साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. मात्र, मंगळवारी २६ रोजी सायंकाळच्या सुमारास त्याने पोलिस ठाण्याच्या टेरेसवर जाऊन विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण सांगली शहर पोलीस दल हादरून गेले आहे.

‘LIC IPO’ चा असाही लाभ ; डिमॅटला प्रचंड प्रतिसाद,लाखो गुंतवणूकदार सीमोल्लंघनास उत्सुक
दुसऱ्या कर्मचाऱ्याला दिसला मृतदेह…

एका कर्मचाऱ्याला टेरेसवर गेला असता अतुल हा पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून जाहीर करण्यात आले. तर अतुलच्या आत्महत्या प्रकरणी शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या एका महिला सावकारीच्या वसुलीच्या जाचातून झाल्याच्या संशय व्यक्त केला आहे. सदर महिलेकडून अतुलने कर्ज घेतलं होतं आणि त्या महिलेला अतुलने चेक दिला होता.

महाराष्ट्र दिनाला राज आणि उद्धव ठाकरेंची जुगलबंदी रंगणार, आंबेडकरांचाही शांती मोर्चा
‘या’ कारणामुळे केली आत्महत्या…

काही दिवसांपूर्वी अतुलचा चेक बाउन्स झाला. या प्रकरणी सदर महिलेने अतुलच्या विरोधात चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिला सावकाराने कर्जाच्या वसुलीचा तगादा अतुलकडे लावला. या नेहमीच्या जाचाला कंटाळून अतुल याने ही आत्महत्या केल्याचा पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आत्महत्येपूर्वी अतुलने एक चिट्ठी लिहिली असून ती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यामध्ये सावकार महिलेचा नावाचा उल्लेख असून वसूलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिट्ठीत नमूद केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.

Oppo चा ‘हा’ बेस्टसेलर स्मार्टफोन हजार रुपयांनी झाला स्वस्त, खूपच कमी किंमतीत खरेदीची संधी; फीचर्स जबरदस्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here