आयरा खाननं इन्स्टाग्रामवर पप्पा आमिर खानसोबतचे फोटो शेअर केला आहे. तिनं त्यात कॅप्शन लिहिली आहे, ‘ओळखा पाहू, कुणी केला आहे मेकअप ? तुमचे वडील येतात आणि तुम्हाला म्हणतात, मी तुझ्यापेक्षा तुझा चांगला मेकअप करून देईन. आणि ते खरं होतं. आता युट्युबच्या शिकवणीची गरज कोणाला आहे?’
आता Kiccha ने विचारलं- ‘मी कन्नडमध्ये लिहिलं असतं तर?’
लेकीचं पप्पा आमिरसोबतचं घट्टं नातं
आमिर आणि आयरा यांचं बापलेकीचं नातं अगदी मित्रत्वाचं आहे. यावेळी फोटोत आयरानं आमिरच्या केसांना हेअरबँड लावलेलाही दिलतोय. तो फोटोही तिनं शेअर केला आहे.

दुसरं लग्नही तुटलं
आयरा खान ही आमिर आणि किरण दत्ताची मुलगी आहे. दोघांना जुनैद नावाचा मोठा मुलगाही आहे. आमिरनं दुसरं लग्न किरण रावशी केलं होतं. त्यांचाही आजाद नावाचा मुलगा आहे. गेल्या वर्षी आमिर आणि किरणनं सेपरेशनची घोषणा केली होती. दोघं मिळून आजादची काळजी घेतात.
आमिरचं त्याच्या कुटुंबावर प्रेम
आमिरनं आपल्या वाढदिवसाला सांगितलं होतं की, आता तो आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देणार आहे. त्यात आयराही आहेच. तो अनेकदा आपल्या मुलांबरोबर दिसत असतो.
ऐश्वर्या रायने नाकारली होती ‘भूल भुलैया १’मधली मंजुलिका, खरं कारण आलं समोर
उत्सुकता ‘लाल सिंग चड्ढा’चा
बराच काळ आमिर खानचा कुठलाच सिनेमा आला नव्हता. आता लाल सिंग चड्ढामधून आमिर खान रसिकांना भेटणार आहे. या सिनेमात करिना कपूर खानही आहे. सिनेमा ११ ऑगस्टला रिलीज होईल. टाॅम हँक्सच्या फाॅरेस्ट गम्पचा हा हिंदी रिमेक आहे.