Video : सोहाने पती कुणालची मारून मारून अवस्था केली वाईट, चाहते म्हणाले- ‘तुला असंच हवं’
सुश्मितानं सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या दोन्ही मुलींचे फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना तिनं लिहिलं होतं की, ‘इथं मुलांसाठी निस्वार्थी प्रेम आहे…’सुश्मिताच्या या पोस्टवर चाहतीनं कॉमेन्ट करत सांगितलं की, ‘माझ्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मी खूप तणावामध्ये आहे. ताण कमी करण्यासाठी आणि स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी मी तुमच्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्ट बघते, त्याबरोबर लिहिलेल्या कॅप्शनही वाचते. त्यातून मला कायमच प्रेरणा मिळते.’

सुश्मितानं दिलं असं उत्तर
चाहतीनं लिहिलेल्या कमेन्ट वाचल्यानंतर सुश्मिताला उत्तर दिल्याशिवाय रहावलं नाही. तिनं उत्तर देताना लिहिलं की, ‘ऑल द बेस्ट जान मेरी. परीक्षा या टेन्शन देण्यासाठीच असतात, हा पॅटर्न तोडून टाक. चांगला अभ्यास कर आणि तुझं सर्वोत्तम दे. तू चांगला अभ्यास करशील.’
१ तासाच्या परफॉर्मन्ससाठी घेतलं मानधन, केला ३ मिनिटांचाच डान्स

दरम्यान,सुश्मिताच्या कामाबद्दल सांगायचं तर आर्या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये ती दिसली होती. त्याचप्रमाणे सुश्मिता तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल याच्याबरोबरच्या रिलेशनमुळेही ती कायम चर्चेत होती. या दोघांच ब्रेकअप झाल्यामुळे सोशल मीडियावर ती खूपच चर्चेत होती. अर्थात ब्रेकअप झाल्यानंतरही सुश्मिता आणि रोहमन एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ब्रेकअपनंतरही ते एकत्रितपणे कार्यक्रमांना उपस्थित राहिलेले दिसले होते.