Ajit Pawar | राज ठाकरे हे सध्या भाजपवर टीका करत नाहीत. ते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरच टीका करतात. राज ठाकरे यांचा सध्याचा अजेंडा ठरला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचा अजेंडा वेगळा होता.

 

Ajit Pawar (3)
Ajit Pawar | सतत तेच तेच सांगून लोकांच्या मनात नको त्या गोष्टी भरवल्या जातात.

हायलाइट्स:

  • भावनेच्या आहारी जाऊन ते समाजात तेढ निर्माण करत आहेत
  • यामुळे दोन जातींमध्ये अंतर निर्माण होईल
मुंबई: भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. यामधून काही घडले तर ज्या जखमा होतील त्या खोलवर जातील. त्यामधून नको ते प्रश्न निर्माण होतील. ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि प्रगतीशील राष्ट्राला परवडणारी नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (DCM Ajit Pawar slams MNS chief Raj Thackeray)
मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंकडून योगी सरकारचे अभिनंदन तर मविआवर निशाणा
यावेळी अजित पवार यांना राज ठाकरे यांच्या भूमिकेविषयी विचारणा करण्यात आली. राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केले. पण योगींनी त्यांच्या राज्यात काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि न्याय देणार आहे. इतकी वर्षे सगळं काही चालत आले आहे. मग राज ठाकरे यांना तेव्हा कोणी थांबवले होते, कोणी नाही म्हटले होते, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस आहे का? अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवला
राज ठाकरे सध्या ज्या मागण्या करत आहेत, त्यामधून उद्या इतरही प्रश्न उद्भवतील. सर्वोच्च न्यायालयाचा भोंग्यांबाबतचा आदेश लागू करायचा म्हटला तर तो एकाच समूहासाठी लागू करून चालणार नाही. मात्र, भावनेच्या आहारी जाऊन ते समाजात तेढ निर्माण करत आहेत. यामुळे दोन जातींमध्ये अंतर निर्माण होईल. कारण नसताना भारतातील प्रगत राज्य असणाऱ्या महाराष्ट्रात अशाने दरी निर्माण करायचा प्रयत्न केलाजात आहे. आपण मुंबईत राहत असल्यामुळे अशा काही गोष्टी आपल्या डोक्यातही नसतात. पण सतत तेच तेच सांगून लोकांच्या मनात नको त्या गोष्टी भरवल्या जातात. यामधून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणार नाही. ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. कारण या सगळ्यातून काही घडलं तर समाजात त्याच्या जखमा खोलवर होतील, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : dcm ajit pawar warns communal tension will create due to mns chief raj thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here