या लोकांनी पैसे खाल्ले आहेत, माझ्या हातात ईडी द्या, मग या लोकांना दाखवतो.एका बाजूला फुटपाथवर लोक झोपतात. हे या लोकांना दिसत नाही काय, असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे. निवडणुका लागल्यातर हे लोक कसे उभे राहणार असा सवाल देखील उदयनराजे यांनी केला आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही, त्यामुळं माझं कुणी नाव घेऊ नये, असं देखील उदयनराजे म्हणाले आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांनी कोल्हापूरच्या सभेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. कोल्हापूरच्या सभेत गर्दी झाली होती मात्र त्या सभेत नव काही बोललं गेलं नाही. कार्यकर्त्यांना काय संदेश देण्यात आला, असा सवाल त्यांनी केला.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली नाही. एक दोन लोक आहेत त्यांच्यामुळं सर्वांना दोषी ठरवू शकत नाही. जे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असं उदयनराजे म्हणाले. ईडीच्या कारवाया देखील हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले आहेत. ईडी किंवा सीबीआय हास्यास्पद झालं आहे. कोणतीही गोष्ट धसाला लावत नाहीत, तडजोड होते असंही मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.