धुळे : शहरातील देवपुर परिसरात असलेल्या त्रिदेव बार मालकाने मॅनेजर व वेटरला बेदम मारहाण केली. त्यात दोघांचा हात फॅक्चर झाला आहे. त्यामुळे आज मोगलाई भागातील रहिवाशांनी धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांची भेट घेत मारहाण करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

‘तुम्ही गल्ल्यातून पैसे काढतात’…

याप्रसंगी दोघा जखमींसह नगरसेविका किरण कुलेवर, माजी नगरसेवक संजय वाल्हे, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, मनोज आगलावे, रुपेश भोकरे, आदी उपस्थित होते. यावेळी जखमींनी आपली आपबिती पत्रकारांशी बोलताना सांगितली. मोगलाईत राहणारे अमोल कोळी हे त्रिदेव बारमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात शनिवारी रात्री त्यांना ‘तुम्ही गल्ल्यातून पैसे काढतात’, असे म्हणत बार मालक विक्रम काळे आणि त्याच्या साथीदारांनी कोळी यांच्यासह जुने धुळ्यातील वेटर पवार यास बेदम मारहाण केली. तेव्हा अमोल कोळी यांनी त्यांना ‘तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. त्यात तुम्ही अगोदर खात्री करा’, असे सांगितले. मात्र, कुठल्याही प्रकारची खात्री न करता त्यांना बेशुद्ध होईपर्यंत विक्रम काळे यांनी मारहाण केली.

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस आहे का? अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवला
बंदूक लावून कोऱ्या कागदावर घेतल्या सह्या…

त्यानंतर त्यांच्या गाडीची चावी काढून घेत घराची चावी देखील हिसकावून घेतली. खिशातले पाचशे रुपये आणि पवार यांच्या बायकोने दिलेले पाच हजार रुपये देखील त्यांनी हिसकावून घेतले. या सर्व घटनेतील विशेष म्हणजे अमोल कोळी यांना बंदूक लावून त्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर अमोल कोळी यांना सहकाऱ्यांनी साडेतीन वाजता त्यांच्या घरी सोडले.

मशिदीवरील भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंकडून योगी सरकारचे अभिनंदन तर मविआवर निशाणा
दोघांचे हात फॅक्चर…

अमोल कोळी व वेटर असलेल्या पवार यांना उठता-बसताही येत नव्हते. त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ देखील उमटले आहेत. काल त्यांची पत्नी गावाहून घरी आली असता हा प्रकार लक्षात आला. कोळी यांनी दवाखान्यात उपचार घेतले त्यात त्यांचा हात फॅक्चर झाला असून वेटर पवार याचा देखील हात फॅक्चर झालेला आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरोधात धमकावणे, मारहाण करणे या कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

‘या’ स्वस्त प्लान्सचे बेनिफिट्स महागड्या प्लान्सपेक्षाही भारी, १५० रुपयांपेक्षा कमीमध्ये डेली १ GB डेटा, फ्री कॉल्स आणि Live TV

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here